Josh hazlewood RCB Wins: कृणालने 2 विकेट घेतल्या, पण पंजाबची अभेद्य तटबंदी कोणी फोडली, फायनल स्पेशालिस्ट खेळाडू आरसीबीच्या विजयाचा खरा शिल्पकार
RCB Vs PBKS: जोश हेझलवूड हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा हुकमी एक्का राहिला आहे. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर संघाने अंतिम फेरीत धडक मारली. कालच्या सामन्यातही हेझलवूडने कमाल केली.

IPL Final 2025 RCB Vs PBKS: आयपीएल स्पर्धेत अनेकांच्या थट्टेचा विषय झालेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने अखेर 18 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपुष्टात जेतेपदावर आपले नाव कोरले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB wins) मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पंजाब सुपरकिंग्जचा (Punjab Super kings) सहा धावांनी पराभव केला. यानंतर मैदानावर आरसीबीच्या खेळाडुंनी आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना पंजाबसमोर 191 धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या डावाची सुरुवात झोकात झाली. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चर्चेचा विषय ठरलेल्या प्रभसिमरन आणि प्रियांश आर्या या दोन्ही नॉन कॅप्ड फलंदाजांनी पहिल्या षटकापासून धावा कुटायला सुरुवात केल्या. पहिल्या पाच षटकांमध्ये प्रभसिमरन आणि प्रियांश आर्या दोघेही सहजपणे चौकार, षटकार ठोकून धावा काढत होते. त्यामुळे पंजाब हा सामना सहज जिंकेल, असे वाटते होते. नेमक्या त्याचवेळी बंगळुरुचा हुकमी एक्का आणि फायनल स्पेशालिस्ट अशी ओळख असणारा जोश हेझलवूड (Josh hazlewood) संघाच्या मदतीला धावून आला.
पंजाबच्या संघाने 5.5 षटकांत 43 धावा केल्या होत्या. त्यामुळे हे दोघेही पंजाबला 80 ते 90 धावा सहज करुन देतील, असे वाटत होते. त्याचवेळी जॉश हेझलवूडने टाकलेल्या एका चेंडूवर फिल सॉल्टने प्रियांश आर्याचा अफलातून झेल पकडला. प्रियांशने हवेत उंच मारलेला हा चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यातच जमा होता. मात्र, फिल सॉल्टने प्रसंगावधान राखत प्रियांश आर्याचा झेल पकडला. इथूनच पंजाबच्या डावाला खिंडार पडले आणि त्यांची लय बिघडली. इथूनच हा सामना फिरला. आरसीबीच्या संघाने कमबॅक करत हा सामना आपल्या बाजूने फिरवला. जॉश हेझलवूडने या सामन्यात निर्णायक क्षणी टिच्चून गोलंदाजी केली, त्यामुळे पंजाबच्या फलंदाजांवरील दबाव वाढला.
Josh hazlewood: जोश हेझलवूडला का म्हणतात फायनल स्पेशालिस्ट?
या सामन्यात जोश हेझलवूडची भेदक गोलंदाजीप्रमाणे त्याचे नशीबही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघासाठी फलदायी ठरले. जोश हेझलवूडने आतापर्यंत 9 विविध फायनल खेळल्या होत्या. या सर्व अंतिम सामन्यांमध्ये जोश हेझलवूड असलेला संघ विजयी झाला होता. काल आरसीबीकडून खेळताना त्याने दहाव्या फायनलमध्ये विजय मिळवला. जोश हेझलवूड याने कालच्या सामन्यात चार षटकांत 54 धावा देऊन 1 महत्त्वाचा बळी मिळवला.
IPL 2025: आयपीएल 2025 च्या पुरस्कारांची संपूर्ण यादी
विजेता संघ - आरसीबी 20 कोटी
उपविजेता - पंजाब किंग्ज संघ 12.5 कोटी
तिसऱ्या स्थानी राहिलेला संघ- मुंबई इंडियन्स 7 कोटी
चौथ्या स्थानी राहिलेला संघ – गुजरात टायटन्स 6 कोटी
अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच – जितेश शर्मा 1 लाख
अंतिम फेरीतील सामनावीर - कृणाल पांड्या 5 लाख रुपये
उदयोन्मुख खेळाडू - साई सुदर्शन 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) - प्रसिद्ध कृष्णा (25 विकेट्स) 10 लाख रुपये आणि पर्पल कॅप
ऑरेंज कॅप - साई सुदर्शन (गुजरात टायटन्स, 759 धावा) 10 लाख रुपये आणि पर्पल कॅप
फँटसी किंग ऑफ द सीझन - साई सुदर्शन 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर(एमव्हीपी) - सूर्यकुमार यादव 15 लाख रुपये आणि ट्रॉफी
फेअरप्ले पुरस्कार - चेन्नई सुपर किंग्ज 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
सुपर सिक्स ऑफ द सीझन - निकोलस पूरन (40 षटकार) १० लाख
ग्रीन डॉट बॉल ऑफ द सीझन - मोहम्मद सिराज 10 लाख
कॅच ऑफ द सीझन - कामिंदू मेंडिस 10 लाख
सुपर स्ट्रायकर वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स) - 10 लाख
फोर ऑफ द सीझन साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) 10 लाख
खेळपट्टी आणि मैदान - दिल्ली कॅपिटल्स होम ग्राउंड 50 लाख
आणखी वाचा
विराट कोहली आता आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार?; आरसीबीने जेतेपद जिंकताच म्हणाला...




















