Arjun Tendulkar : सचिनचा लेक अर्जून पुन्हा मुंबई इंडियन्सकडेच, मागील वर्षीपेक्षा अधिक रक्कम देत केलं खरेदी
Arjun Tendulkar in Mumbai Indians: अर्जून तेंडुलकर पुन्हा मुंबई इंडियन्स संघातच गेला असून त्याला नुकतच संघाने खरेदी केलं आहे.
IPL Auction 2022: क्रिकेटचा देव म्हटलं जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) आतापर्यंत आपली खास छाप क्रिकेटच्या मैदानात सोडू शकलेला नाही. मागील वर्षी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याला 20 लाखांच्य़ा बेस प्राईसला विकत घेतलं होत. पण एकाही सामन्यात त्याला मैदानात खेळवलं नव्हतं. दरम्यान यंदाही त्याला मुंबईनेच खरेदी केलं असून मागील वर्षीच्या तुलनेत 10 लाख अधिक देत मुंबईने 30 लाखांना त्याला संघात सामिल केलं आहे. यंदाच्या लिलावात मुंबईने ईशान किशनला तब्बल 15.25 कोटी देत संघात घेतलं असून यंदाच्या आयपीएलमधील ही सर्वात मोठी बोली आहे.
असा आहे मुंबईचा संघ
मुंबईने लिलावापूर्वी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार कायरन पोलार्ड यांना रिटेन केलं होतं. या सर्वांसाठी संघाने तब्बल 42 कोटी मोजले होते. पण त्यानंतर आता लिलावात संघाला यष्टीरक्षक, फिरकीपटू, फिनीशर अशा काही महत्त्वाच्या जागांवर स्टार खेळाडूंची गरज होती. त्यानुसार त्यांनी बोली लावत सर्वात आधी यष्टीरक्षक फलंदाज आणि डावखुरा फलंदाज म्हणून ईशान किशनला तब्बल 15.25 कोटी देत संघात घेतलं. त्यानंतर सर्वात मोठी बोली म्हटलं तर त्यांनी हार्दीक पंड्याला रिप्लेसमेंट म्हणून 8.25 कोटी खर्च करत एक अष्टपैलू खेळाडू ताफ्यात घेतला. हा खेळाडू म्हणजे सिंगापूरचा युवा अष्टपैलू खेळाडू टीम डेविड (TIim David). टीम याच्यावर अवघ्या 40 लाखांची बेस प्राईस लावण्यात आली होती. ज्यानंतर केकेआर, मुंबईसारख्या संघानी त्याच्यावर बोली लावण्यास सुरुवात केली. पण सर्वाधिक पैसे बटव्यात उरलेल्या मुंबईने टीमला 8.25 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामिल केले. संघातील अनुभवी गोलंदाज ट्रेन्ट बोल्टला राजस्थानने खरेदी केल्यामुळे संघात जसप्रीतच्या जोडीला अनुभवी गोलंदाजाची गरज होती. त्यासाठी त्यांनी इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरला विकत घेतलं आहे. तब्बल 8 कोटी मोजत त्यांनी जोफ्राला संघात सामिल करुन घेतलं आहे.
मुंबई इंडियन्स संघ
रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमरा (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी), ईशान किशन (15.25 कोटी), डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी), बसिल थम्पी (30 लाख), मुरुगन आश्विन (1.6 कोटी), जयदेव उनाडकट (1.30 कोटी), मयांक मार्कंडे (65 लाख), तिलक वर्मा (1.70 कोटी), संजय यादव (50 लाख), जोफ्रा आर्चर (8 कोटी), डॅनियल सॅम्स (2.60 कोटी), टिमल मिल्स (1.5 कोटी), टीम डेव्हिड (8.25 कोटी), रिले मरेडिथ (1 कोटी), मोहम्मद अर्शद खान (20 लाख), अर्जून तेंडुलकर (30 लाख)
हे ही वाचा :
- IPL 2022 Mega Auction: बुमराहच्या जोडीला आणखी एक वर्ल्ड क्लास वेगवान गोलंदाज मुंबई इंडियन्समध्ये, 8 कोटींनी केलं खरेदी
- IPL 2022 Mega Auction: अंडर 19 विश्वचषक विजेत्या संघाच्या कर्णधारापेक्षा अधिक महाग हा खेळाडू, महाराष्ट्राचा आणखी एक खेळाडू चेन्नईमध्ये
- IPL Mega Auction Live Streaming Day 2: आयपीएल मेगा ऑक्शन 2022 लाईव्ह कधी, कुठे आणि कसं पाहायचं?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha