(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022 Mega Auction: बुमराहच्या जोडीला आणखी एक वर्ल्ड क्लास वेगवान गोलंदाज मुंबई इंडियन्समध्ये, 8 कोटींनी केलं खरेदी
IPL Auction 2022 Updates: दुसऱ्या दिवशीच्या ऑक्शनमध्ये आता चुरस दिसून येत आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सकडे सध्याच्या घडीला सर्वाधिक रक्कम असल्याने त्यांना हव्या त्या खेळाडूवर ते तगडी बोली लावत आहेत.
IPL Auction 2022 Updates: आयपीएल 2022 साठी महालिलाव पार पडत असून सामन्यांप्रमाणेच अतिशय चुरशीत हा लिलावही पार पडत आहे. सर्वाधिक वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने नुकताच एक मोठा डाव खेळला आहे. संघातील अनुभवी गोलंदाज ट्रेन्ट बोल्टला राजस्थानने खरेदी केल्यामुळे संघात जसप्रीतच्या जोडीला अनुभवी गोलंदाजाची गरज होती. त्यासाठी त्यांनी इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरला विकत घेतलं आहे. तब्बल 8 कोटी मोजत त्यांनी जोफ्राला संघात सामिल करुन घेतलं आहे. मुंबईसह यावेळी राजस्थानचा संघ जोफ्राला घेण्यासाठी बोली लावत होते. हैद्राबाद संघानेही या बोलीत उडी घेतली होती. पण अखेर मुंबईने 8 कोटी रुपयांना जोफ्राला संघात घेतलं.
यंदा जोफ्रा मैदानात दिसण्याची शक्यता कमी
सध्या दुखापतीमुळे मैदानावर उतरत नसणारा जोफ्रा आर्चर या आयपीएल हंगामात मैदानात उतरण्याची शक्यता कमी आहे. पण महालिलाव दरवर्षी पार पडत नसल्याने मुंबईने ही मोठी बोली लावत एक क्लासिक खेळाडू संघात घेतला आहे. दरम्यान बुमराह आणि जोफ्रा एका संघात आल्यानंतर मुंबईचा खेळ कमाल होणार अशी चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.
ईशानवर लागली तगडी बोली
यंदाच्या हंगमात आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन ठरला आहे. मुंबई इंडियन्स संघाने अपेक्षाप्रमाणे ईशान किशनला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मुंबईने ईशान किशनसाठी तब्बल 15.25 कोटी रुपये मोजले आहेत. ज्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावात आतापर्यंत ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आयपीएल लिलावाच्या इतिहासात ईशान किशन सर्वाधिक बोली लागणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत युवराज सिंह पहिल्या क्रमांकावर आहे. युवराज सिंहवर 16 कोटींची बोली लागली होती.
महत्वाच्या बातम्या :
- IPL 2022 Mega Auction: अंडर 19 विश्वचषक विजेत्या संघाच्या कर्णधारापेक्षा अधिक महाग हा खेळाडू, महाराष्ट्राचा आणखी एक खेळाडू चेन्नईमध्ये
- IPL Mega Auction Live Streaming Day 2: आयपीएल मेगा ऑक्शन 2022 लाईव्ह कधी, कुठे आणि कसं पाहायचं?
- IPL 2022 Auction : 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू, पाहा संपूर्ण 590 खेळाडूंची यादी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha