(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Mega Auction Live Streaming Day 2: आयपीएल मेगा ऑक्शन 2022 लाईव्ह कधी, कुठे आणि कसं पाहायचं?
IPL Mega Auction Live Streaming Day 2: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मेगा ऑक्शनला शनिवार सुरुवात होणार आहे. आयपीएल मेगा ऑक्शनचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे.
IPL Mega Auction Live Streaming Day 2: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मेगा ऑक्शनला शनिवारी (12 फेब्रुवारी) सुरुवात झाली. बंगळरू येथे दोन दिवस मेगा ऑक्शनचा कार्यक्रम पार पडत आहे. आज मेगा ऑक्शनचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. यंदाचा हंगाम खूप रोमांचक असणार आहे. कारण यावेळी आठऐवजी 10 संघ सहभागी होणार आहेत. मेगा ऑक्शनमध्ये उत्कृष्ट खेळाडूंना संघात सामील करण्याचा प्रत्येक फ्रँचायझीचा प्रयत्न असेल.
आयपीएलच्या पंधराव्या हंगमातील मेगा ऑक्शनचा आज दुसरा दिवस आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळांडूवर पैशांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यासह गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जांयट्स यांनीही उत्कृष्ट खेळाडूंना खरेदी केलंय.
आयपीएलचं मेगा ऑक्शन कधी, कुठे पाहायचं?
आयपीएलचं मेगा ऑक्शनचा दोन दिवसाचा (12- 13 फेब्रुवारी) कार्यक्रम बंगळुरू येथे पार पडत आहे. स्टार नेटवर्कवर आयपीएलचं मेगा ऑक्शनचं प्रक्षेपण पाहता येणार आहे. तसेच आयपीएलच्या मेगा ऑक्शनचं लाईव्ह स्ट्रिमिंग डिज्नी हॉटस्टारवर पाहता येणार आहे.
तुमच्या आवडत्या संघाकडं शिल्लक रक्कम किती?
1) चेन्नई सुपर किंग्ज- 20.45 कोटी
2) मुंबई इंडियन्स- 27.85 कोटी
3) दिल्ली कॅपिटल्स- 16.50 कोटी
4) कोलकाता नाईट रायडर्स- 12.65 कोटी
5) गुजरात टायटन्स- 18.85 कोटी
6) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- 9.25 कोटी
7) लखनऊ सुपर जायंट्स- 6.90 कोटी
8) राजस्थान रॉयल्स- 12.15 कोटी
9) पंजाब किंग्ज- 28.65 कोटी
10) सनरायझर्स हैदराबाद- 20.15 कोटी
- IPL 2022 Auction Preity Zinta : आयपीएल लिलावात प्रीती झिंटा गैरहजर; 'हे' आहे कारण
- IPL 2022 Auction : 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू, पाहा संपूर्ण 590 खेळाडूंची यादी
- Pooja Vastrakar : 'जास्त प्रयोग करण्यापेक्षा माझ्या ताकतीचा वापर करेन': पूजा वस्त्राकर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha