IPL 2024 Shreyas Iyer: आयपीएलची ट्रॉफी जिंकताच एका तरुणीसोबत दिसला श्रेयस अय्यर; कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?, पाहा
IPL 2024 Shreyas Iyer: श्रेयस अय्यरसोबतची मिस्ट्री गर्ल कोण आहे?, असे प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.
IPL 2024 Shreyas Iyer: आयपीएल 2024 च्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखील जेतेपद पटकावलं. 26 मे रोजी झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) अंतिम सामन्यात कोलकाताना 8 विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताने अंतिम सामना जिंकल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचं खूप कौतुक होत आहे. याचदरम्यान श्रेयस अय्यरचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरुन श्रेयस अय्यरसोबतची मिस्ट्री गर्ल कोण आहे?, असे प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.
अफगाणिस्तानची वाजमा अयूबीने श्रेयस अय्यरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाजमा अयूबी क्रिकेटची खूप मोठी चाहती आहे. सामना पाहण्यासाठी ती नेहमी विविध ठिकाणी उपस्थित असते. वाजमा अयूबी भारतीय क्रिकेट संघाला देखील पाठिंबा देताना दिसून येते. आयपीएलचं जेतेपद पटकावल्यानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरसोबत वाजमा अयूबीने फोटो काढला. यावेळी एक विजयी कर्णधार श्रेयस अय्यरसोबत, असं कॅप्शनही वाजमा अयूबीने दिलं आहे.
One with the winning captain @ShreyasIyer15 🧑✈️ pic.twitter.com/EvxTOqjYjB
— Wazhma Ayoubi 🇦🇫 (@WazhmaAyoubi) May 28, 2024
दिल्लीलाही पोहचवलं होतं अंतिम फेरीत-
श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्त्व करत असताना संघाला 2020 च्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीच्या लढतीत पोहोचवलं होतं. श्रेयस अय्यर 2022 पासून केकेआरचं नेतृत्त्व करत आहे. 2023 च्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर दुखापतीमुळं आयपीएलबाहेर होता. केकेआरचं नेतृत्त्व त्यावेळी नितीश राणानं केलं होतं. मात्र, 2024 च्या आयपीएलमध्ये केकेआरचं नेतृत्त्व पुन्हा एकदा श्रेयस अय्यरकडे आलं. यावेळी श्रेयस अय्यरनं केकेआरला विजेतेपद मिळवून दिलं.
श्रेयस अय्यर टीम इंडियाचा पुढील कर्णधार?
आगामी काळात श्रेयस अय्यर टीम इंडियाचा कर्णधार असेल. मला वाटतं कॅप्टन पदाच्या शर्यतीत श्रेयस अय्यर आहे, शुभमन गिल कॅप्टन होण्यापूर्वी श्रेयस भारताचा कॅप्टन होऊ शकतो. श्रेयसकडे टीम सांभाळण्याची पद्धत आणि कौशल्य आहे, असं रॉबिन उथप्पानं म्हटलं आहे.
कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही…- श्रेयस अय्यर
एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात श्रेयस अय्यरची महत्वाची भूमिका होती. या स्पर्धेत विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह श्रेयस अय्यरही आघाडीवर होता. श्रेयस अय्यरने 11 सामन्यात 530 धावा त्याने केल्या. परंतु विश्वचषकानंतर श्रेयस अय्यरसाठी कठीण काळ आला. त्याच्या मागे पाठीचे दुखणे लागले. त्याला कसोटी स्पर्धेतून बाहेर राहावे लागले. त्यानंतर रणजी करंडक स्पर्धेचा एक सामना न खेळल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला करारातून बाहेर ठेवले आहे. दीर्घकाळापासून माझे पाठीचे दुखणे सुरु होते. परंतु माझ्या पाठीच्या दुखापतीवर लोक विश्वास ठेवत नव्हते. विश्वचषक स्पर्धेनंतर मी निश्चितच संघर्ष करत होतो, असं श्रेयस अय्यरने एका मुलाखतीत सांगितले होते.