Rohit Sharma : आज तुझा भाऊ बस चालवणार, रोहित शर्माचा अनोखा अंदाज, चेन्नईला सूचक इशारा
Rohit Sharma Viral Video: मुंबई इंडियन्सचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा टीमची बस चालवताना दिसत आहे. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होते.
मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) पहिल्यांदा आमने सामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमने सामने येतील. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्स आणि ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्ज एकमेकांना भिडणार आहेत. या मॅचपूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये मुंबईचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा टीमची बस (Rohit Sharma Driving Bus) चालवताना दिसून येत आहे. मुंबई इंडियनसच्या बससमोर चाहत्यांची गर्दी असल्यानं रोहित शर्मानं बस चालवण्याचा निर्णय घेतला. या व्हिडीओत रोहित शर्मासह मुंबईचे इतर खेळाडू देखील दिसत आहेत.
रोहित शर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई इंडियन्सची बस चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रोहितच्या चाहत्यांना त्याचा नवा व्हिडीओ देखील आवडला आहे. रोहितचे आणि मुंबईचे चाहते या व्हिडीओवर मजेशीर कमेंट करत आहेत. मुंबईच्या टीमच्या बसच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून रोहित शर्मानं एक प्रकारे चेन्नई सुपर किंग्जला इशारा तर दिलेला नाही ना अशा चर्चा सुरु आहेत.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने
आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि सातव्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्स यांच्यात उद्या लढत होणार आहे. चेन्नईनं यंदाच्या आयपीएलमध्ये 3 मॅच जिंकल्या आहेत. तर मुंबई इंडियन्सनं दोन मॅच जिंकल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जला पाच पैकी दोन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला तर मुंबई इंडियन्सला पाच पैकी तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.
Rohit Sharma - A total fun character in life. 😄👌pic.twitter.com/W9SBJXhHdT
— Johns. (@CricCrazyJohns) April 13, 2024
मुंबई इंडियन्स विजयाची हॅट्रिक करणार?
मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तीन मॅचमधील पराभवानंतर मुंबई इंडियन्सला पहिला विजय वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मिळाला होता. यानंतर मुंबईनं आरसीबीला देखील पराभूत केलं. मुंबईकडे आता दिल्ली आणि बंगळुरुला पराभूत केल्यानंतर चेन्नईवर विजय मिळवत हॅट्रिकची संधी आहे. मुंबईनं वानखेडेवर झालेल्या तीन पैकी दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे.
दरम्यान, उद्याच्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्ज बाजी मारणार की मुंबई इंडियन्स होम ग्राऊंडवर तिसरा विजय मिळणवार हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या