फाफ डु प्लेसिस अन् कोहलीचा वार, गुजरातचा पलटवार, कार्तिक स्वप्नीलनं विजयाचा झेंडा रोवला, आरसीबीची विजयाची हॅट्रिक
IPL 2024 RCB vs GT : आयपीएलमध्ये आज बंगळुरु येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स आमने सामने आले होते.
IPL 2024 GT vs RCB बंगळुरु : आयपीएलमध्ये (IPL 2024) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील मॅचमध्ये फुल ड्रामा पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 147 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीनं आक्रमक सुरुवात केली होती. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं डावाची सुरुवात आक्रमकपणे करुन दिली होती. पॉवरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आरसीबीच्या 92 धावा झालेल्या असताना फाफ डु प्लेसिस 64 धावांवर बाद झाला. यानंतर गुजरातनं कमबॅक करत आरसीबीचं टेन्शन वाढवलं होतं. गुजरातनं पुढच्या 25 धावांमध्ये आरसीबीचे आणखी 5 फलंदाज करत कमबॅक केलं होतं. अखेर दिनेश कार्तिक आणि स्वप्निल सिंग यांनी महत्त्वाची भागिदारी करत आरसीबीला विजय मिळवून दिला.
आरसीबीचा सलग तिसरा विजय
फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं गुजरात टायटन्सवर 4 विकेटनं विजय मिळवला. गुजरात टायटन्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 147 धावा केल्या होत्या. आरसीबीनं हे आव्हान यशस्वीपणे पार केलं. आरसीबीचा हा यंदाच्या आयपीएलमधील चौथा विजय ठरला. तर, आरसीबीनं आजच्या विजयासह सलग तीन विजय मिळवले आहेत. आरसीबीनं होम ग्राऊंडवर गुजरात टायटन्सला पराभूत केलं आहे. आरसीबीनं गुजरातला त्यांच्या होमग्राऊंडवर पराभूत केलं होतं. त्यानंतर त्यांनी सनरायजर्स हैदराबादला त्यांच्या होम ग्राऊंडवर हरवलं. आज बंगळुरुनं स्वत:च्या होम ग्राऊंडवर विजय मिळवला.
फाफ डु प्लेसिसचा आणि कोहलीचा वार
गुजरातनं ठेवलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीनं आक्रमकपणे सुरुवात केली होती. आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिसनं 64 धावा केल्या आणि तो बाद झाला. आरसीबीच्या सलामीवीरांनी म्हणजेच विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं 92 धावांची भागिदारी केली.
गुजरातचा पलटवार
गुजरात टायटन्सनं आरसीबीच्या आक्रमक सुरुवातीनंतर देखील पलटवार केला. आरसीबीची पहिली विकेट 92 धावांवर पडली होती. यानंतर आरसीबीच्या विकेटची माळ लागली. गुजरातच्या बॉलर्सनी आरसीबीवर दबाव बनवला. यामध्ये आरसीबीच्या फलंदाजांनी पटापट विकेट फेकल्या. फाफ डु प्लेसिसनं 64 धावा केल्या. विराट कोहलीनं 42 धावा केल्या. या दोघांशिवाय इतर खेळाडू अपयशी ठरले. यामध्ये कॅमेरुन ग्रीन, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल यांनी निराशाजनक कामगिरी केली. गुजरातच्या बॉलर्सनी यांना बाद करत पलटवार केला होता. आरसीबीची स्थिती 6 विकेटवर 117 धावा अशी झाली होती.
दरम्यान, यानंतर दिनेश कार्तिक आणि स्वप्नील सिंगनं आरसीबीला विजय मिळवून दिला.
संबंधित बातम्या :
बातमी अपडेट होत आहे...