GT vs RCB : 1,2,6, गुजरात टायटन्सची टॉप ऑर्डर पुन्हा फेल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांचा धमाका
IPL 2024 GT vs RCB : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात मॅच सुरु आहे. आरसीबीनं गुजरातला सुरुवातीला तीन धक्के दिले.
![GT vs RCB : 1,2,6, गुजरात टायटन्सची टॉप ऑर्डर पुन्हा फेल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांचा धमाका ipl 2024 gt vs rcb gujarat titans top order once again fail royal challengers bengaluru siraj green marathi news GT vs RCB : 1,2,6, गुजरात टायटन्सची टॉप ऑर्डर पुन्हा फेल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांचा धमाका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/04/be0ebfb038a3e66782468565abb11efc1714835917525989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बंगळुरु : आयपीएलमध्ये (IPL 2024) आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आमने सामने आले आहेत. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात यंदाच्या आयपीएलमधील 52 वी लढत एमए. चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. बंगळुरुचा कॅप्टन फाफ डु प्लेसिसनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सला पहिल्यांदा फलंदाजीसाठी बंगळुरुचा कॅप्टन डु प्लेसिसनं आमंत्रित केलं. गुजरात टायटन्सची डावाची सुरुवात चांगली झाली नाही. मोहम्मद सिराजनं गुजरातला पहिला धक्का दिला. यानंतर गुजरातच्या फलंदाजांवर दबाव वाढला. गुजरातच्या फलंदाज वेगात धावा करु शकले नाहीत.
साहा आणि गिल पुन्हा फेल
गुजरात टायटन्सचे सलामीवीर रिद्धिमान साहा आणि कप्तान शुभमन गिल आज देखील चांगली सलामी देऊ शकले नाहीत. रिद्धिमान साहा याला मोहम्मद सिराजनं 1 रनवर बाद केलं. साहा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. यानंतर मोहम्मद सिराजनं गुजरातला आणखी एक धक्का दिला. यावेळी गुजरातचा कॅप्टन शुभमन गिलला त्यानं बाद केलं. शुभमन गिल 2 धावा करुन बाद झाला.
साई सुदर्शन देखील मोठी धावसंख्या करु शकला नाही. कॅमेरुन ग्रीननं साई सुदर्शनला 6 धावांवर बाद केलं. गुजरातची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा फेल झाली. गुजरात टायटन्सचे प्रमुख तीन फलंदाज बाद करुन आरसीबीनं मोठं यश मिळवलं. गुजरातच्या तीन विकेट 19 धावांवर गेल्या आहेत.
आरसीबी विजयाची हॅट्रिक करणार?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन वेळा विजय मिळवला आहे. बंगळुरुनं गुजरात टायटन्सला त्यांच्या होम ग्राऊंडवर पराभूत केलं होतं. विराट कोहली आणि विल जॅक्सच्या खेळीच्या जोरावर बंगळुरुनं विजय मिळवला होता. दुसरीकडे बंगळुरुनं सनरायजर्स हैदराबादला देखील त्यांच्या होम ग्राऊंडवर पराभूत केलं होतं. आता आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत बंगळुरुला विजयाची हॅट्रिक करण्याची संधी आहे.
गुजरातकडे होम ग्राऊंडवरील पराभवाची परतफेड करण्याची संधी
आरसीबीनं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सचा नऊ विकेटनं पराभव केला होता. त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.
दरम्यान, आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चार वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये प्रत्येकी दोन दोन मॅच दोन्ही संघांनी जिंकल्या आहेत.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)