RCB मियां मॅजिक करणार, थेट सिराजला सलामीला धाडणार?
Mohammed Siraj Royal Challengers Bengaluru : आरसीबीचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले आहेत. विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
IPL Mohammed Siraj Royal Challengers Bengaluru : जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर आज रॉयल आमनासामना होणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये आज सायंकाळी साडेसात वाजता लढत होणार आहे. राजस्थान संघ भन्नाट फॉर्मात आहे, तर दुसरीकडे आरसीबीच्या संघाला अद्याप विजयी लय सापडलेली नाही. आरसीबीचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले आहेत. विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, रजत पाटीदार यांच्या बॅटमधून अद्याप धावा निघाल्या नाहीत. फलंदाजी ही आरसीबीची दुबळी बाजू होत आहे. आजच्या सामन्यात आरसीबी मोठा डाव खेळणार का? मियां मॅजिकचा डाव आरसीबी खेळणार का? असा चाहत्यांना प्रश्न पडलाय. आरसीबीने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओनंतर या चर्चेला उधाण आले आहे. आरसीबीनं मोहम्मद सिराज याच्या फलंदाजीचा व्हिडीओ आरसीबीने पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओत आरसीबी सलामीला पाठवणार का? असा सवालही मॅनेजमेंटला विचारत आहे.
मोहम्मद सिराज आरसीबीच्या गोलंदाजी विभागाचं नेतृत्व करतो. यंदाच्या हंगामात सिराजला अद्याप सूर गवसलेला नाही. पण त्यानं लखनौविरोधात आपल्या फलंदाजीतील चुणूक दाखवून दिली. त्यानं लागोपाठ दोन षटकार मारत चाहत्यांचं मनोरजंन केले होते. मागील काही दिवसांपासून मोहम्मद सिराज गोलंदाजीसोबत फलंदाजीवरही काम करतोय. त्याच्या फलंदाजीमध्ये मोठी सुधारणा दिसत आहे. लखनौविरोधात आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर सिराजने अखेरीस 8 चेंडूमध्ये 12 धावा काढल्या होत्या. यामध्ये दोन षटकार होते.
Fielding drills and Match Day feels! 🤩 Let’s get down to business. 🔥
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 6, 2024
This is @bigbasket_com presents Bold Diaries. Download the Big Basket App and get groceries delivered in 10 minutes. 📱#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #RRvRCB pic.twitter.com/UbZjt1cZ8A
राजस्थानविरोधातील सामन्यापूर्वी आरसीबीने मोहम्मद सिराजचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये नेट्समध्ये मोहम्मद सिराज फटेकाबाजी करताना दिसत आहे. मोहम्मद सिराज चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडतोय. मोहम्मद सिराजने चेंडू स्टेडियमबाहेर मारले. ते चेंडू मिळालेही नाही. यावेळी सिराज म्हणतो, मी अॅटॅकिंग खेळाडू आहे. मला डिफेन्स करायला सांगितलं जातं. इथं काय कसोटी सुरु आहे का ? आरसीबीचे काही खेळाडू सिराजच्या बॅटिंगचं कौतुक करतानाही दिसत आहे.
व्हिडीओत सिराज आणि अँडी फ्लॉवर यांच्यामधील संवादही रोचक आहे.
अँडी फ्लॉवर सिराजला म्हणतात की, दोन षटकार मारले अन् तू लगेच फलंदाज झाला का?
त्यावर सिराज म्हणतो, तुम्ही मला सलामीला पाठवणार का?
अँडी फ्लॉवर म्हणतात... बरं, तू दर्जेदार फटके मारलेत. तू सलामीला गेला तर सगळे चेंडू फ्रंट फूटवर मिळतील असं नाही.
पाहा व्हिडीओ
𝗠𝗶𝘆𝗮𝗻 𝗺𝗮𝗮𝗿 𝗿𝗮𝗵𝗮𝗻 𝗵𝗮𝗶𝗻 🏏😮
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 6, 2024
“Are you sending him opening?” - Watch what Andy and Siraj had to say on @bigbasket_com presents Bold Diaries.#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #RRvRCB pic.twitter.com/40tyNoNQ2i