Vintage Dhoni : असा झेल होणे नाही, धोनीनं हवेत सूर मारत घेतला अविश्वसनीय झेल!
Vintage MS Dhoni Catch : 42 वर्षीय एमएस धोनीनं आयपीएल 2024 च्या (IPL 2024) आधी चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोडलं.
Vintage MS Dhoni Catch : 42 वर्षीय एमएस धोनीनं आयपीएल 2024 च्या (IPL 2024) आधी चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोडलं. चेन्नईची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आली. धोनी (MS Dhoni) कर्णधार असो अथवा नसो... त्याची क्रेझ कायम आहे. धोनीने गुजरातविरोधात विकेटच्या मागे शानदार झेल घेतला. 42 वर्षाच्या धोनीने हवेत झेपवत जबरदस्त झेल घेतला. त्यानंतर स्टेडियममधील उपस्थित असणाऱ्या चाहत्यांकडून एकच धोनी धोनीचा नारा लावला ठोकला गेला. धोनीने घेतलेल्या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. चेन्नई आणि आयपीएलच्या अधिकृत पेजवर हा धोनीच्या झेलचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. नेटकऱ्यांकडून धोनीच्या व्हिडीओला लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव होतो.
𝗩𝗶𝗻𝘁𝗮𝗴𝗲 𝗠𝗦𝗗 😎
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2024
An excellent diving grab behind the stumps and the home crowd erupts in joy💛
Head to @JioCinema and @StarSportsIndia to watch the match LIVE#TATAIPL | #CSKvGT pic.twitter.com/n5AlXAw9Zg
चेन्नईने दिलेल्या 207 धावांच्या अशक्यप्राय अव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. साहा आणि गिल एकापाठोपाठ एक तंबूत परतले. त्यामुळे विजय शंकर मैदानार आला होता. विजय शंकर एकेरी दुहेरी धावा घेत होता. आठवं षटक घेऊन डॅरेल मिचेल आला. मिचेलच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विजय शंकरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूने बॅटची कट घेतली.. त्यावेळी धोनीने हवेत सूर मारत झेल टिपला. धोनीने घेतलेल्या या अविश्वसनीय झेलनंतर चेन्नईच्या ताफ्यात आनंदाचं वातावरण होतं. चाहतेही आनंदात नाचत होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. कॅप्टन कूल एमएस धोनीची 42 व्या वर्षातील चपळता तरुणांनाही लाजवेल. धोनीची फिटनेस चर्चेचा विषय़ आहे. दुखापतीनंतर त्यानं कमबॅक केलेय.
Still got it! 💪🏻🔥#ThalaThalaDhaan
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 26, 2024
pic.twitter.com/U1QZs6DmW1
He was struggling with knee injury just last season, now he's taken the catch of the season with a vintage full stretched dive
— 𝐒𝐈𝐕𝐘 🇺🇸🇮🇳 (@Sivy_KW578) March 26, 2024
MS Dhoni at age 42 has unreal fitness levels and his dedication to the game is unmatched 💛 pic.twitter.com/RUkF4uLBwc
CSK कडून 207 धावांचा डोंगर -
रचिन रविंद्रची आक्रमक सुरुवात आणि शिवम दुबे (Shivam Dube) याचं झंझावती अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने (CSK) निर्धारित 20 षटकांमध्ये 6 विकेटच्या मोबदल्यात 206 धावांपर्यंत मजल मारली. शिवम दुबेने 51 धावांचा पाऊस पाडला. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी 46 धावा केल्या. अखेरीस समीर रिझवी याने झटपट धावा केल्या. गुजरातकडून राशिद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. गुजरातला चेपॉकवर सामना जिंकण्यासाठी 207 धावांची गरज आहे.