Mayank Yadav :शाळा सोडून क्रिकेट खेळण्याची घेतलेली रिस्क, मयंक यादवनं दोन मॅचमध्येच दाखवली झलक, आता मोठं गिफ्ट मिळणार?
Mayank Yadav : लखनौ सुपर जाएंटसचा वेगवान गोलंदाज मयंक यादवनं आयपीएलच्या 17 व्या हंगामात आपल्या गोलदांजीच्या जोरावर खळबळ उडवून दिली आहे. मयंकला टीम इंडियात संधी द्यावी, असं म्हटलं जातंय.
बंगळुरु : आयपीएलच्या 17 (IPL 2024) व्या पर्वात अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये आणखी एका युवा खेळाडूची भर पडली आहे. मयंक यादव (Mayank Yadav) यानं लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) साठी दोन मॅच खेळत दमदार कामगिरी केली आहे. दोन्ही मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार त्यानं नावावर केला आहे. 21 वर्षीय मयंक यादवनं त्याच्या करिअरमध्ये आयपीएलच्या केवळ दोन मॅच खेळल्या आहेत.
मयंक यादवनं त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना धडकी भरवली आहे. मयंकच्या कामगिरीची दखल घेत त्याला टीम इंडियात संधी देण्याची मागणी केली जातेय. आरसीबी विरुद्ध त्यानं 4 ओव्हरमध्ये 14 धावा देत 3 विकेट घेतल्या आहेत. मयंक यादवनं आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये ताशी 150 किमी आणि त्यापेक्षा अधिक वेगानं गोलंदाजी केली. आरसीबीच्या विरुद्ध त्यानं स्वत :चा विक्रम मोडत ताशी 156.7 किमी वेगानं बॉलिंग केली.
मयंक यादवचा आयपीएलपर्यंत पोहोचण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. क्रिकेटसाठी त्यानं शाळा सोडण्याची रिस्क घेतली होती. मयंक यादवनं त्याच्या एका मुलाखतीत त्यानं माहिती दिली होती. मयंकनं घरच्यांना सांगितलं होतं की तो घरी जाणार नाही. घरचे लोक टेन्शनमध्ये आले होते, आतापर्यंत क्रिकेट खेळलं नाही, अजून सराव करत आहे आणि शाळा सोडली तर कसं चालेल, असा प्रश्न त्यांना पडल्याचं मयंक म्हणाला.
मयंक यादव म्हणाला त्यानंतर घरी कधी कधी वडील रागावायचे, घरी टेन्शन निर्माण व्हायचं. यानंतर घरच्यांना फक्त 6 महिन्यांचा वेळ मागितला. जर निवड झाली नाही तर तुम्ही म्हणाल ते करेन, असं घरच्यांना सांगितल्याचं मयंकनं म्हटलं होतं. मयंक यादवनं आतापर्यंत आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंटससाठी दोन मॅचमध्ये बॉलिंग केली आहे. यामध्ये त्यानं 6.83 च्या सरासरीनं 6 विकेट घेतल्या आहेत.
An uncapped Indian pacer destroying the stumps of a batter. 🔥
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 2, 2024
- Mayank Yadav has impressed everyone in just 2 matches!pic.twitter.com/mLZLi6rc0R
टीम इंडियाची दारं उघडणार
मयंक यादवला लखनौ सुपर जाएंटसनं 2022 च्या आयपीएलसाठी संघात घेतलं होतं. मात्र, त्याला एकाही मॅचमध्ये संधी मिळाली नव्हती. 2023 च्या आयपीएलमध्ये दुखापतीमुळं त्याला संधी मिळाली नव्हती. 2024 च्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये त्याला संधी मिलाली. त्यामध्ये त्यानं पंजाबच्या तीन विकेट घेतल्या. त्यासाठी 27 धावा दिल्या होत्या. आरसीबी विरुद्ध त्यानं 14 धावा देत 3 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आणि सध्या राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथनं मयंक यादवला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत संधी द्यावी, असं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्सला धक्का; आयपीएलमधील 'पर्पल कॅप'चा मानकरी अचनाक मायदेशी परतला
Mayank Yadav LSG: राजनाधी एक्सप्रेस...फक्त दोन सामने खेळला अन् मयंक यादवने स्वत:चाच विक्रम मोडला!