IPL 2024, CSK vs SRH : मुस्तफिजूर रहमान मायदेशी परतला, चेन्नई तरीही टेन्शन फ्री, जाणून घ्या कारण
CSK vs GT : चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आज आयपीएलची 18 वी लढत होणार आहे. या लढतीत चेन्नईच्या संघात मुस्तफिजूर रहमान नसणार आहे.
![IPL 2024, CSK vs SRH : मुस्तफिजूर रहमान मायदेशी परतला, चेन्नई तरीही टेन्शन फ्री, जाणून घ्या कारण ipl 2024 csk vs srh chennai super kings bowler mustafijur rahman miss match but not get tension IPL 2024, CSK vs SRH : मुस्तफिजूर रहमान मायदेशी परतला, चेन्नई तरीही टेन्शन फ्री, जाणून घ्या कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/3d3cb76ce93ebdc35e0397370f16e4011712316268473989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हैदाराबाद:गतविजेती चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) आज आमने सामने येणार आहेत चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात यंदाच्या आयपीएलची (IPL 2024) 18 वी मॅच होणार आहे. आज सांयकाळी राजीव गांधी इंटरनॅशनलल स्टेडियम हैदराबाद इथं दोन्ही टीम भिडणार आहेत. चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या आयपीएलमध्ये विजयानं सुरुवात केली होती. मात्र, त्यांना तिसऱ्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. चेन्नईनं यंदाच्या आयपीएलमध्ये दोन विजयांसह चार गुण मिळवले आहेत.
चेन्नई सुपर किंग्जला पुन्हा विजय मिळवून कमबॅक करण्याची संधी आहे. या दरम्यान चेन्नईचा महत्त्वाचा बॉलर मुस्तफिजूर रहमान मायदेशी म्हणजेच बांगलादेशला परतला आहे. मुस्तफिजूरनं 7 विकेट घेतल्या होत्या. मुस्तफिजूर रहमान बांगलादेशला व्हिसा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गेला असल्याची माहिती आहे. यंदा वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुस्तफिजूर रहमान मायदेशी परतला असल्याची माहिती आहे.
मुस्तफिजूर रहमान बांगलादेशला परत गेला असला तरी चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडला टेन्शन घेण्याची गरज नसल्याचं दिसून येत आहे. मुस्तफिजूरच्या गैरहजेरीत चांगली गोलंदाजी करु शकतील असे तगडे बॉलर्स चेन्नईकडे आहेत. मुस्तफिजूर रहमान नसला तरी संघात दीपक चहर, तुषार देशपांडे आणि मथिशा पथिराना असे तगडे बॉलर्स आहेत.
भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरनं चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना आतापर्यंतच्या तीन मॅचेसमध्ये तीन विकेट घेतल्या आहेत. तुषार देशपांडे यानं 2023 च्या आयपीएलमध्ये चेन्नईसाठी चांगली कामगिरी केली होती.
चेन्नई सुपर किंग्जसाठी चेन्नईच्या मथिशा पथिरानानं चांगली कामगिरी केली आहे. त्यानं गेल्या मॅचमध्ये मिशेल मार्श आणि ट्रिस्टन स्टब्सला यॉर्कर टाकत बाद केलं होतं. त्यामुळं चेन्नई सुपर किंग्जकडे मुस्तफिजूर रहमान नसला तरी तुषार देशपांडे, दीपक चहर आणि मथिशा पथिराना यांची तगडी टीम आहे.
चेन्नई सुपर किंग्ज विजयाच्या मार्गावर परतणार
चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या आयपीएलमध्ये विजयासह सुरुवात केली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिल्याच मॅचमध्ये चेन्नईनं पराभूत केलं होतं. यानंतर गुजरात टायटन्सला देखील चेन्नईनं पराभूत केलं होतं. यानंतर रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जला पराभव स्वीकारावा लागला होता.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)