एक्स्प्लोर

IPL 2024: यंदा आयपीएलचं जेतेपद कोण पटकावणार?; ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने जाहीर केलं संघाचं नाव!

IPL 2024: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने यंदा आयपीएलमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या संघाचं नाव जाहीर केलं आहे. 

IPL 2024: आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये प्ले ऑफमध्ये सध्या 2 जागा रिक्त आहेत, ज्यासाठी 5 संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स  (RR) आधीच पात्र झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स अजूनही स्पर्धेत आहेत. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने यंदा आयपीएलमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या संघाचं नाव जाहीर केलं आहे. 

यंदाची आयपीएल राजस्थान रॉयल्स जिंकेल असं मला वाटतं. या हंगामात राजस्थान संघाचा परफॉर्मन्स उत्तम आहे. त्यामुळे हा हंगाम जिंकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, असं हेडनने सांगितलं, स्टार स्पोर्ट्सच्या एका शो मध्ये हेडनने यंदाची आयपीएल कोणती टीम जिंकेल याबाबत त्याने आपली भविष्यवाणी केली. राजस्थान रॉयल्सचा अनुभवी खेळाडू जोस बटलर सध्या इंग्लंडला परतला आहे. महत्त्वाच्या मॅचेसमधील त्याची अनुपस्थिती राजस्थान रॉयल्सच्या संघाला चांगलीच जाणवू शकते. 

राजस्थानचा सलग चौथा पराभव-

कर्णधार सॅम करनच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने राजस्थानचा पाच विकेटने पराभव केला. राजस्थानने दिलेले 145 धावांचे आव्हान पंजाबने पाच विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. पंजाबकडून कर्णधार सॅम करन यानं नाबाद 63 धावांची खेळी केली. पंजाबनं या विजयासह गुणतालिकेत नवव्या स्थान मिळवले. मुंबई इंडियन्स दहाव्या क्रमांकावर घसरला आहे. संजू सॅमसन याचा राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफमधील स्थान निश्चित झालेय. पण त्यांना लागोपाठ चौथ्या पराभवाचा सामना करावा लागलाय. राजस्थानच्या फलंदाजांकडून लौकिकास साजेशी कामगिरी झालेली नाही. प्लेऑफआधी राजस्थानच्या संघासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना रियान परागच्या 48 धावांच्या मोबदल्यात 144 धावांपर्यंत मजल मारली होती. पंजाबने हे माफक आव्हान पाच विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. 

प्लेऑफसाठी फक्त दोन जागा - 

कोलकाताने 19 तर राजस्थानने 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. त्यांचं स्थान आता निश्चित झालेय. आता फक्त दोन जागांसाठी स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, आरसीबी, दिल्ली आणि लखनौ या संघामध्ये चुरस आहे. यामध्ये दिल्ली आणि लखनौ यांचं स्पर्धेतील आव्हान रामभरोसेच आहे. त्यामुळे दोन जागांसाठी खरी लढत तीन संघामध्येच होणार आहे. पण स्पर्धेतील आव्हान संपलेले संघ अनेकांची पार्टी खराब करु शकतात. 

संबंधित बातम्या:

ICC T-20 World Cup 2024: दोनदा टोलावले 6 चेंडूत 6 षटकार; 9 चेंडूत अर्धशतक; टी-20 विश्वचषकात या खेळाडूवर असेल सर्वांचं लक्ष!

किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?

आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MS Dhoni IPL 2026 : थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ
थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Harshit Rana News : टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
Blessing Muzarabani News : आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या
आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli IPS officer: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Embed widget