LSG vs CSK : ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं कराराच्या यादीतून वगळलं, स्टोइनिसनं आयपीएल गाजवलं, तुफानी खेळीद्वारे उत्तर दिलं, म्हणाला...
LSG vs CSK : लखनौ सुपर जाएंटसनं चेन्नई सुपर किंग्जवर सहा विकेटनं विजय मिळवला. मार्कस स्टोइनिसनं नाबाद 124 धावांची खेळी करत लखनौला विजय मिळवून दिला.
चेन्नई : लखनौ सुपर जाएंटसनं (Lucknow Super Giants) चेन्नई सुपर किंग्चा (Chennai Super Kings) सहा विकेटने पराभव केला आहे. लखनौनं सलग दुसऱ्या मॅचमध्ये चेन्नईला पराभूत केलं. लखनौच्या विजयात ऑस्ट्रेलियन खेळाडू मॉार्कस स्टोइनिसचं (Marcus Stoinis) योगदान महत्त्वाचं ठरलं. स्टोइनिसनं 63 बॉलमध्ये 124 धावांची खेळी करत लखनौला विजय मिळवून दिला. स्टोइनिसला या खेलीबद्दल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी त्यानं मनमोकळेपणानं विविध प्रश्नांची उत्तरं दिली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून क्रिकेटपटूंसोबत मार्च महिन्यात करार केले. या करारामधून मार्कस स्टोइनिसला वगळण्यात आलं होतं. आयपीएलमधील शतकी कामगिरी करुन स्टोइनिसनं आस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला आरसा दाखवला आहे.
मार्च महिन्यात आस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून खेळाडूंसोबत करार करण्यात आले. त्यामध्ये मार्कस स्टोइनिस, अस्टॉन अशर यांना वगळण्यात आलं होतं. लखनौकडून शतकी खेळी करुन त्यांना विजय मिळवून दिल्यानंतर तो मनमोकळेपणानं बोलला. यावेळी स्टोइनिसनं युवा खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि राष्ट्रीय क्रिकेट टीमसाठी चांगली कामगिरी करण्याचा सल्ला दिला.
मार्कस स्टोइनिस म्हणाला की, त्याचे आस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या हेड कोच सोबत चांगले संबंध असूनही त्याला करारबद्ध करण्यात आलं नाही.नवीन तरुण संघात येत आहेत, त्यांना संधी मिळतेय. ते माझी जागा घेत आहेत, याचा आनंद आहे. मात्र, खेळाच्या दृष्टीनं विचार केला तर मला क्रिकेट खेळायचं असून संघासाठी योगदान द्यायचंय, असं स्टोइनिस म्हणाला.
स्टोइनिसनं चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 63 बॉलमध्ये 124 धावंची खेळी केली. यामध्ये त्यानं 13 चौकार आणि 6 षटकार मारले. या खेळीच्या जोरावर त्यानं चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचं पाणी पाजलं.
अखेरच्या ओव्हरचा थरार
लखनौ सुपर जाएंटसला अखेरच्या ओव्हरमध्ये 17 धावांची गरज होती. लखनौ सुपर जाएंटसला 17 धावा हव्या असताना स्टोइनिसनं पहिल्याच बॉलवर सिक्स मारला. यानंतर पुढील तीन बॉलवर त्यानं तीन चौकार मारले.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव करुन लखनौ सुपर जाएंटसनं गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. लखनौनं पाच मॅच जिंकल्या असून त्यांच्याकडे 10 गुण आहेत.
संबंधित बातम्या :