RCB IPL 2026 : सरकारचा हिरवा कंदील! जेथे चेंगराचेंगरीत 11 जणांनी जीव गमावला, तेथेच होणार RCB चे सामने; चिन्नास्वामीवर कडक अटी लागू
Bengaluru M Chinnaswamy Stadium IPL 2026 : आयपीएल 2026 च्या हंगामाबाबत अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नसले तरी गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) साठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

IPL 2026 Bengaluru M Chinnaswamy Stadium : इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या हंगामाबाबत अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नसले तरी गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) साठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आगामी हंगामातील आपले होम सामने आरसीबीला पुन्हा एकदा बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळण्याची परवानगी मिळाली आहे. 12 फेब्रुवारी रोजी कर्नाटक राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतर संध्याकाळी आरसीबी फ्रँचायझीला अधिकृत परवानगी देण्यात आली. मात्र, ही परवानगी काही अटींसह देण्यात आली असून त्यांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे.
🚨35K FANS ARE ALLOWED🚨
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) February 13, 2026
- The Karnataka government has decided to allow IPL matches at the Chinnaswamy Stadium and has instructed KSCA to permit 30,000 to 35,000 fans inside the stadium. pic.twitter.com/uLy0Qs8nkK
2025 मधील दुर्दैवी घटना
4 जून 2025 रोजी आरसीबीने आपल्या इतिहासातील पहिले आयपीएल विजेतेपद पटकावल्यानंतर स्टेडियम परिसरात मोठा जल्लोष झाला. मात्र यादरम्यान झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव स्टेडियमवर तात्पुरती बंदी घातली होती. त्यानंतर येथे कोणतेही सामने खेळवले गेले नव्हते.
पर्यायी मैदानांच्या शोधात होती आरसीबी
एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाबत निर्णय लांबणीवर पडल्याने आरसीबीने पर्यायी मैदानांचा शोध सुरू केला होता. त्यासाठी नवी मुंबईतील रायपूरमधील डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियम आणि शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ही दोन स्टेडियम शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. मात्र अखेर या दोन्ही पर्यायांवर अंतिम शिक्कामोर्तब झाले नाही. दरम्यान, कर्नाटक क्रिकेट संघाचे नवे अध्यक्ष वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामने पुन्हा बंगळुरूमध्ये आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. कॅबिनेट बैठकीपूर्वीही त्यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले होते.
सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नाही
कर्नाटक सरकारने सामन्यांना परवानगी देताना सुरक्षेच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आहे. मंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितले की, कॅबिनेटने कुन्हा अहवालानुसार काही अटी मान्य केल्या आहेत. त्यानुसार स्टेडियममध्ये जास्तीत जास्त 35,000 प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल आणि इतर सुरक्षात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. आता सर्वांच्या नजरा बीसीसीआयकडे लागल्या असून पुढील काही दिवसांत आयपीएल 2026 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा -





















