(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईने सामना जिंकल्यावर रोहितने केला पत्नी रितिकाला फोन, काय झाले संभाषण?
IPL 2023 : दिल्लीचा पराभव करत मुंबईने आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील पहिला विजय नोंदवला
Rohit Sharma Video Call DC vs MI IPL 2023 : दिल्लीचा पराभव करत मुंबईने आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील पहिला विजय नोंदवला. मुंबईने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. रोहित शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. अखेरच्या चेंडूवर दिल्लीचा पराभव केल्यानंतर रोहित शर्माने पत्नी रितिका सजदेह हिला व्हिडीओ कॉल केला. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर चाहत्यांनी रिअॅक्शन दिल्या आहेत. आयपीएलच्या ट्वीटर खात्यावरही काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.
लागोपाठ दोन पराभवानंतर मुंबईला पहिला विजय मिळाला आहे. दिल्लीचा अखेरच्या चेंडूवर पराभव करत मुंबईने पहिला विजय मिळवला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पत्नी रितिका सजदेह हिला व्हिडीओ कॉल केला. हा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड होत असल्याचेही रोहितने यावेळी रितिकाला सांगितले. त्यानंतर रितिक हसायला लागले. रोहित शर्मा आणि रितिकाच्या व्हिडीओ कॉलवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईने हा व्हिडीओ आपल्या ट्वीटवर पोस्ट केलाय. यावर एका चाहत्याने म्हटलेय.. संगळा व्हिडीओ टाकेपर्यंत, जोपणार नाही, अशी कमेंट एका यजर्सने केली होती. त्यावर मुंबईने सब्र करो.. असे प्रत्युत्तर दिले.
Ro on call with Rits after a nail-biting win in Delhi 🥺💙#OneFamily #DCvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @ImRo45 pic.twitter.com/qCXaLj8dwT
— Mumbai Indians (@mipaltan) April 12, 2023
𝘠𝘦 𝘵𝘰𝘩 𝘣𝘢𝘴 𝘵𝘦𝘢𝘴𝘦𝘳 𝘩𝘢𝘪, poori picture ke liye kal subah jaldi utho ⏰🍿#OneFamily #DCvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @ImRo45 MI TV pic.twitter.com/M3kl81btPi
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2023
मुंबई इंडियन्सकडून दिल्लीचा धुव्वा
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केली. तर तिलक वर्मा याने झटपट 41 धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी पाच धावांची गरज होती. पण एनरिख नॉर्जे याने यॉर्कर गोलंदाजी करत टिम डेविड आणि कॅमरुन ग्रीन यांना धावा काढून दिल्या नाहीत. अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील मुंबईचा पहिला विजय आहे. तर दिल्लीचा सलग चौथा पराभव झाला. रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी केली. पहिल्या चेंडूपासून रोहित शर्मा याने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहित शर्माने 45 चेंडूत 65 धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्मा याने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. रोहित शर्मा याने सुरुवातीला ईशान किशन याच्यासोबत 71 धावांची भागीदारी केली. त्यानंतर तिलक वर्मा याच्यासोबतही अर्धशतकी खेळी केली.