एक्स्प्लोर

IPL 2023 : संजू सॅमसनला बोल्ड करत जडेजानं रचला विक्रम, टी-20 मध्ये दमदार कामगिरी, गाठला 200 विकेट्सचा टप्पा

CSK vs RR : रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) संजू सॅमसनला (Sanju Samson) बोल्ड करत इतिहास रचला आहे. दिग्गज अष्टपैलू खेळाडूही हा पराक्रम करू शकले नाहीत.

IPL 2023 Ravindra Jadeja : इंडियन प्रीमियर लीग 2023 (Indian Premier League) चा 17 वा सामना 12 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात खेळला गेला. चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) झालेल्या या रोमहर्षक सामन्यात राजस्थानने  (Rajasthan Royals) चेन्नईचा 3 (Chennai Super Kings) धावांनी पराभव केला. अखेरच्या षटकात चेन्नईला सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज होती. मात्र अखेरच्या षटकात चेन्नईला केवळ 17 धावा करता आल्या. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान संघाने 8 बाद 175 धावा केल्या. विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी धोनीच्या नेतृत्त्वात संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून 172 धावा करता आल्या. 

जडेजाने टी20 मध्ये घेतल्या 200 विकेट्स

या सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला असला तरी, चेन्नई संघातील रविंद्र जडेजा याने नवा विक्रम रचला आहे. रविंद्र जडेजाने राजस्थानविरुद्ध डावातील नववं षटक टाकलं. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जडेजाने राजस्थानचा फलंदाज देवदत्त पडिक्कलला तंबूत परत पाठवलं. त्यानंतर त्याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर त्याने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला एका अप्रतिम चेंडू बोल्ड केलं. राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसनला खातंही उघडता आलं नाही. या विकेटसह जडेजाने टी-20 क्रिकेटमध्ये 200 विकेट पूर्ण केल्या आहेत. जडेजाच्या कारकिर्दीतील 296 व्या सामन्यात त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 200 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.

T20 क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेणारा पहिला भारतीय

रविंद्र जडेजाची टी20 (T20) क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. 200 विकेट्स घेत त्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जडेजाची टी-20 क्रिकेटमधील कामगिरी उत्तम आहे. त्याने टी20 मध्ये 7.55 च्या प्रभावी इकॉनॉमीवर गोलंदाजी केली आहे. याशिवाय त्याचा सर्वोत्तम स्पेल म्हणजे 16 धावांत देत 5 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर जडेजाने धावाही केल्या आहेत. जडेजाने 25.38 च्या सरासरीने 3173 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याच्या नावावर दोन अर्धशतकंही आहेत. यामुळेच जडेजा हा जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो.

21 धावा देत घेतले दोन बळी

नवव्या षटकात रविंद्र जडेजाने आधी पडिक्कल आणि नंतर कर्णधार संजू सॅमसनला शून्यावर बाद करून दोन गडी बाद करत मोठं यश मिळवलं. जडेजानं चार षटकांत 21 धावा देत दोन बळी घेतले. तुषार देशपांडे आणि आकाश सिंग यांनी धावा दिल्या पण दोघांनाही प्रत्येकी 2-2 गडी बाद करण्यात यश मिळालं. मोईन अलीनेही एक विकेट आपल्या नावावर केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 : काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' क्षण! धोनी मैदानावर आल्यावर करोडो चाहत्यांनी रोखला श्वास, रेकॉर्डब्रेक प्रेक्षकांची नोंद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Vaibhav Suryavanshi RR vs SRH IPL 2026: हैदराबादची बँटिग संपण्यापूर्वीच ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट अन् पॅड चढवून थाटात बसला, तिथेच वैभव सूर्यवंशीचा गेम झाला
वैभव सूर्यवंशी हैदराबादची बँटिग संपण्यापूर्वीच ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट अन् पॅड चढवून थाटात बसला अन्...
Kavya Maran SRH vs RR IPL 2026: वैभव सूर्यवंशी शून्यावर बाद होताच काव्या मारन नाचत सुटली; कुमार संगकाराही बघत बसला, VIDEO
वैभव सूर्यवंशी शून्यावर बाद होताच काव्या मारन नाचत सुटली; कुमार संगकाराही बघत बसला, VIDEO
Sanju Samson Close Friend Tovino Thomas: संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
Embed widget