एक्स्प्लोर

IPL 2023 Points Table : मुंबई इंडियन्सकडून हैदराबादचा पराभव, गुणतालिकेत मोठी उडी; पॉईंट्स टेबलची सध्याची स्थिती जाणून घ्या

IPL Points Table After MI vs SRH : मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादचा पराभव केल्यानंतर गुणतालिकेत मोठी उडी घेतली आहे. मुंबई संघ आठव्या स्थानावरून सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 च्या 25 सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 14 धावांनी पराभव केला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने (MI) सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून हॅटट्रिक केली आहे. मुंबईने सनरायझर्स हैदराबादला (SRH) सामना जिंकण्यासाठी 193 धावांचं लक्ष्य दिलं होतं, पण कर्णधार एडन मार्करमचा संघ 19.5 षटकांत 178 धावांत सर्व गडी बाद झाला. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने 192 धावा केल्या. कॅमेरॉन ग्रीनने मुंबई इंडियन्सकडून 40 चेंडूत सर्वाधिक 64 धावा केल्या. हैदराबादच्या सामन्यात 14 धावांनी विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत झेप घेतली आहे.

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर गुणतालिकेत बदल

आयपीएलच्या 16 हंगामात सर्व दहा संघांनी आतापर्यंत प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत. मुंबईच्या विजयानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. मुंबई संघ आठव्या क्रमांकावरून मोठी उडी घेत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच सामने खेळले असून संघाकडे सध्या 6 गुण आहेत. दरम्यान, टॉप 4 संघांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. राजस्थान रॉयल्सचा संघ 8 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर यानंतर लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स हे संघ आहेत. गुणतालिकेत लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर आहे. लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघाकडे प्रत्येकी 6-6 गुण आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सची गुणतालिकेत घसरण

दरम्यान, आयपीएल पॉईंट्समध्ये कोलकाता नाईट रायडर्सची गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आठव्या क्रमांकावर आहे. याशिवाय सनरायझर्स हैदराबाद नवव्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्ससोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघाकडे प्रत्येकी 4 गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा संघ पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सला अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. दिल्ली यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, पण पाच वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rohit Sharma in IPL : मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा आणखी एक विक्रम, आयपीएलमध्ये 'विराट' कामगिरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Embed widget