(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MI vs SRH 1st Innings Highlight : कॅमेरॉन ग्रीनचं दमदार अर्धशतक, मुंबईचं हैदराबादला 193 धावांचं लक्ष्य
MI vs SRH 1st Innings Highlight : मुंबई संघाने पाच गडी बाद 192 धावांची खेळी केली. आता हैदराबाद संघाला 193 धावांचं लक्ष्य दिलं आहे.
MI vs SRH IPL 2023 1st Innings Highlight : आयपीएलच्या 24 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई संघाने पाच गडी बाद 192 धावांची खेळी केली. आता हैदराबाद संघाला 193 धावांचं लक्ष्य दिलं आहे. मुंबई संघांची सुरुवात संथ गतीने झाली. पण त्यानंतर संघाने झटपट धावा केल्या.
मुंबईचं हैदराबादला 193 धावांचं लक्ष्य
हैदराबादच्या घरच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या आयपीएल 2023 मधील 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत पाच गडी गमावून 192 धावा केल्या. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघासमोर आता 193 धावांचं आव्हान आहे. मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक नाबाद 64 धावा केल्या. तसेच तिलक वर्माने 17 चेंडूत 37 धावा केल्या. ईशान किशनने 31 चेंडूत 38 धावांची दमदार खेळी केली. कर्णधार रोहित शर्माने 18 चेंडूत 28 धावा केल्या. हैदराबादकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक दोन बळी घेतले.
Innings Break!#MumbaiIndians post a formidable total of 192/5 on the board.#SRH chase coming up shortly. Stay tuned!
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2023
Scorecard - https://t.co/oWfswiuqls #TATAIPL #SRHvMI #IPL2023 pic.twitter.com/C7TfCDGbsE
कॅमेरॉन ग्रीनचं दमदार अर्धशतक
मुंबई इंडियन्सकडून कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक धावा केल्या. ग्रीनने 40 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार ठोकत 64 धावांची चमकदार खेळी केली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तिलक वर्माने शानदार फलंदाजी केली. तिलकने अवघ्या 17 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकार मारत 37 धावा केल्या. त्याशिवाय इशान किशनने 38 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा डाव लवकर आटोपला. त्याने 18 चेंडूत 28 धावा केल्या. टीम डेव्हिडने 11 चेंडूत 16 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवचा डावही थोडक्यात आटोपला. सुर्यकुमार सात धावांवर बाद झाला. सनरायझर्सकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक दोन बळी घेतले. भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळालं.
रोहित शर्माच्या आयपीएलमध्ये सहा हजार धावा
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. रोहित शर्माने आयपीएल कारकिर्दीतील सहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. ही कामगिरी करणारा रोहित शर्मा आयपीएलमदील चौथा खेळाडू ठरला आहे. रोहितने सामन्याच्या 2.2 षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर चौकार मात आयपीएलमध्ये सहा हजार धावा पूर्ण केल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :