एक्स्प्लोर

Rohit Sharma in IPL : मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा आणखी एक विक्रम, आयपीएलमध्ये 'विराट' कामगिरी

Rohit Sharma in IPL : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माच्या त्याच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील 6000 धावा (6000 Runs in IPL Career) पूर्ण केल्या आहेत.

Rohit Sharma in IPLआयपीएल 2023 (IPL 2023) मधील (MI vs SRH) 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सनराजयर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad.) पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई संघाने 192 धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघ 178 धावांवर ऑल आऊट झाला. हा सामना मुंबईने 14 धावांनी जिंकला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आणखी एक विक्रम नोंदवण्यात आला आहे. रोहित शर्माच्या त्याच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील 6000 धावा पूर्ण केल्या आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने 28 धावा केल्या. यासोबतच त्याच्या इंडियन प्रीमियर लीगमधील सहा हजार धावांचा टप्पा पूर्ण झाला आहे.

रोहित शर्माच्या आयपीएलमध्ये 6000 धावा

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. रोहित शर्माने आयपीएल कारकिर्दीतील सहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. ही कामगिरी करणारा रोहित शर्मा आयपीएलमदील चौथा खेळाडू ठरला आहे. रोहितने सामन्याच्या 2.2 षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर चौकार मात आयपीएलमध्ये सहा हजार धावा पूर्ण केल्या.

पहिल्या हंगामापासून रोहित शर्मा खेळतोय आयपीएल

2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून म्हणजेच आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रोहिता शर्मा खेळत आहे. रोहित सुरुवातीला डेक्कन चार्जर्स संघाचा खेळाडू होता. त्यानंतर त्याला मुंबई संघात संधी मिळाली. तेव्हापासून तो मुंबई संघाचा भाग आहे. 2013 पासून मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माने 18 एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात तामिळनाडूचा खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने टाकलेल्या सामन्यातील तिसऱ्या षटकातील पहिले तीन चेंडू मारले. रोहित शर्माने जेव्हा दुसरा चौकार लगावला तेव्हा त्याने आयपीएल मधील 6000 धावांचा टप्पा पूर्ण केला. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने 18 चेंडूंत 28 धावा केल्या आणि तो तामिळनाडूच्या नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

'ही' कामगिरी करणारा चौथा खेळाडू

आयपीएलच्या कारकिर्दीमध्ये 6000 धावा करणारा रोहित शर्मा हा चौथा खेळाडू आहे. त्याच्या आधी विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सहा हजार धावांचा टप्पा गाठला आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 232 सामन्यांमध्ये 6 हजार 14 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहित शर्माने एक शतक आणि 41 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच, त्याने 535 चौकार आणि 247 षटकार ठोकले आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या 109 धावांची आहे. तसेच, आयपीएलमधील त्याचा स्ट्राइक रेट 130.03 असून सरासरी धावसंख्या 30.22 आहे. रोहित एक चांगला क्षेत्ररक्षकही आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 97 झेल घेतले आहेत. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मुंबई इंडियन्स हा पाच वेळ आयपीएल चॅम्पियन ठरलेला एकमेव संघ आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaNana Patole On Shinde And Ajit Pawar| होळीच्या शुभेच्छांसह पटोलेंकडून शिंदे, अजितदादांना  मुख्यमंत्रिपदाची ऑफरABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 14 March 2025ABP Majha Headlines : 02 PM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Embed widget