(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR New Captain : मोठी बातमी! श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत नितीश राणा केकेआरचा कर्णधार
Kolkata Knight Riders : आयपीएल 2023 चा आगामी हंगाम सुरु होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणून नितीश राणा याचं नाव अधिकृत ट्वीट करत केकेआरनं जाहीर केलं आहे.
KKR New Captain, IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या आगामी हंगामासाठी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाने आपला कर्णधार जाहीर केला असून संघातील अनुभवी फलंदाज नितीश राणा (nitish rana) याला ही मोठी संधी देण्यात आली आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी दोन ते तीन महिने लागणार असल्याने तो आयपीएलला मुकणार आहे. अशामध्ये संघाकडे बरेच पर्याय असताना नितीश राणाला जबाबदारी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का संघ व्यवस्थापनाने दिला आहे.
Kaptaan - 𝘠𝘦 𝘵𝘰𝘩 𝘣𝘢𝘴 𝘵𝘳𝘢𝘪𝘭𝘦𝘳 𝘩𝘢𝘪. Action begins, 1st April 2023 🔥😉@NitishRana_27 #AmiKKR #KKR #TATAIPL2023 pic.twitter.com/q6ofcO2WGG
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 27, 2023
नितीश राणा 2018 पासून केकेआरशी जोडला गेलेला आहेत. याआधी केकेआरचा नवा कर्णधार म्हणून शार्दुल ठाकूर, नारायण अशी नावंही समोर येत होती. मात्र फ्रँचायझीने भारतीय फलंदाजावर विश्वास व्यक्त करत त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. राणा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. फलंदाज म्हणून राणाचा आयपीएलमधील रेकॉर्ड खूपच चांगला राहिला आहे. नितीश राणाने 2016 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. त्याच्या दुसऱ्या सत्रातच राणाने 300 हून अधिक धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तथापि, 2018 च्या मेगा लिलावापूर्वी केकेआरने नितीश राणाला करारबद्ध केले होते. तेव्हापासून राणा फ्रँचायझीसाठी पाच हंगाम खेळला आहे. राणाच्या आतापर्यंतच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर त्याने 91 सामन्यात 28 च्या सरासरीने 2181 धावा केल्या आहेत. राणाने आयपीएलमध्ये 15 अर्धशतकेही झळकावली आहेत. मात्र, टॉप ऑर्डरमध्ये खेळूनही नितीशला अद्याप आयपीएलमध्ये शतक झळकावता आलेले नाही. 2021 मध्ये, नितीश राणालाही श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियासाठी वनडे आणि टी-20 पदार्पण करण्याची संधी मिळाली.
हे पर्यायही संघाकडे होते...
जागतिक क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जाणारा बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शकीब अल हसन हा कर्णधारपदाच्या जबाबदारीसाठी एक योग्य पर्याय होता. शाकिबला आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. 2012 च्या आयपीएल हंगामापासून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा महत्त्वाचा भाग असलेला सुनील नारायण संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्याचा एक चांगला पर्याय होता. सुनीलला इतर खेळाडूंपेक्षा फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्याचा अनुभवही जास्त आहे आणि तो KKR च्या दुसऱ्या T20 लीगमध्ये खेळणाऱ्या संघांचाही एक भाग आहे. याशिवाय जेव्हा संघ आयपीएलमध्ये 2 वेळा विजेते ठरला तेव्हा सुनीलने बॅट आणि बॉल या दोन्ही बाजूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. तसंच केकेआरकडून शार्दुल ठाकूरचा हा पहिलाच हंगाम असेल, पण एक स्टार आणि आंतरराष्ट्रीय अनुभव असणारा ते खेळाडू असल्याने तो संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडू शकला असता.
हे देखील वाचा-