(Source: Poll of Polls)
LSG vs DC, IPL 2023 : एकटा मार्क वुड दिल्लीवर भारी, भेदक गोलंदाजी करत निम्मा संघ तंबूत परतवला
IPL 2023, LSG vs DC : लखनौने दिल्ली विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात विजयी सलामी देत 50 धावांसह दणदणीत विजय मिळवला. लखनौच्या मार्क वुडने निम्मा संघ तंबूत परतवला.
Lucknow Super Giants vs Delhi Capitals : आयपीएल 2023 मध्ये लखनौने (LSG) दिल्ली (DC) विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात विजयी सलामी देत 50 धावांसह दणदणीत विजय मिळवला. लखनौच्या मार्क वुडने निम्मा संघ तंबूत परतवला. हा सामना लखनौमधील एकाना स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात लखनौ संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी केली. लखनौने 50 धावांनी सामना जिंकला. लखनौनं दिल्लीला 194 धावांच्या लक्ष्यं दिलं होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाचा डाव 20 षटकांत 9 गडी गमावून 143 धावांवर आटोपला. लखनौकडून मार्क वुडने धडक गोलंदाजी करत दिल्लीचे पाच गडी बाद केले.
लखनौचा दिल्लीवर 50 धावांनी विजय
इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये शनिवारी तिसरा सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. लखनौने दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला. लखनौच्या या विजयात वेगवान गोलंदाज मार्क वुडची कामगिरी मोलाची आहे. मार्क वूडने चार षटकांत पाच बळी घेतले. यादरम्यान त्याने केवळ 14 धावा केल्या. अशाप्रकारे मार्क वूड आयपीएल 2023 मध्ये पाच विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे. या सामन्यात पृथ्वी शॉ मार्क वुडचा पहिला बळी ठरला.
This is a @MAWood33 appreciation post. Literally. 🫶#LSGvDC | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #LSG | #GazabAndaz pic.twitter.com/e0qAjkxMJP
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 2, 2023
डेव्हिड वॉर्नरची झुंज एकाकी
194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांच्या सलामी जोडीने सुरुवात केली. वॉर्नर आणि पृथ्वी यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. यानंतर मार्क वुडने सलग दोन चेंडूंवर पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये पाठवून दिल्ली संघाच्या धावसंख्येला पूर्ण ब्रेक लावला.
मार्क वुडची बेधडक गोलंदाजी
यानंतर 48 धावांवर मार्क वूडने सरफराज खानला तंबुत परत पाठवत दिल्ली संघाला तिसरा धक्का दिला. सरफराज खान केवळ चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर वॉर्नरने रिले रॉसोसह डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि चौथ्या विकेटसाठी 30 चेंडूत 38 धावांची संथ भागीदारी केली. या सामन्यात 20 चेंडूत 30 धावांची खेळी केल्यानंतर रोसूही बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
पॉईंट्स टेबलमध्ये लखनौ पहिल्या स्थानावर
लखनौ सुपर जायंट्सने घरच्या मैदानावर दमदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. लखनौने दिल्ली संघाला 194 चं लक्ष्य दिलं होतं. त्यानंतर लखनौने झंझावाती गोलंदाजी करत दिल्लीला नमवलं. मार्क वुडने पाच विकेट घेत दिल्ली संघाला 143 धावांवर ऑलआऊट केलं आणि लखनौला 50 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.