एक्स्प्लोर

LSG vs DC, IPL 2023 : काइल मेअर्सचा झंझावत अन् मार्क वूडच्या पाच विकेट, लखनौचा दिल्लीवर 50 धावांनी विजय

LSG vs DC, IPL 2023 Live : लखनौकडून मार्क वूड याने भेदक मारा करत दिल्लीचा अर्धा संघाला तंबूत धाडले. 

LSG vs DC, IPL 2023 Live : काइल मेअर्सची झंझावाती 73 धावांची खेळी अन् मार्क वूडच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लखनौने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची विजयी सुरुवात केली. राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघाने दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला. लखनौने दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने 9 गड्यांच्या मोबदल्यात 143 धावांपर्यंत मजल मारली. डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज दिली.  लखनौकडून मार्क वूड याने भेदक मारा करत दिल्लीचा अर्धा संघाला तंबूत धाडले. 

पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांनी चार षटकात 40 धावांची विस्फोटक सलामी दिली. पण मार्क वूड याने लागोपाठ दोन चेंडूवर दोन विकेट घेत दिल्लीला बॅकफूटवर ढकलले. पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्श एकापाठोपाठ एक बाद झाले. त्यानंतर दिल्लीची फलंदाजी कोसळली. लखनौकडून मार्क वूड याने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर आवेश खान आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. 

दिल्लीच्या फलंदाजाची हाराकिरी 

कर्णधार डेविड वॉर्नर आणि रिले रुसो यांचा अपवाद वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाजाला अश्वासक खेळी करता आली नाही. पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, सर्फराज खान रॉवमन पॉवेल, अमन खान यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. कर्णधार डेविड वॉर्नर याने एका बाजूला किल्ला लढवला पण दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. पृथ्वी शॉ 12, मिचेल मार्श 00, सर्फराज खान 4, अमन खान 4, रॉवमन पॉवल 1 यांना मोठी खेळी करता आली नाही. 

वॉर्नरची एकाकी झुंज - 

एका बाजूला विकेट पडत असताना वॉर्नर याने दुसऱ्या बाजूने धावा काढल्या. त्याला रुसोचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. वॉर्नर याने 58 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान वॉर्नर याने सात चौकार लगावले. ठरावीक अंतराने विकेट पडत असल्यामुळे वॉर्नर यानेही दबावात फलंदाजी केली. आवेश खान याने अखेर वॉर्नरला बाद करत दिल्लीला बॅकफूटवर ढकलले. 

लखनौची भेदक गोलंदाजी -

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना काइल मेअर्सच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनौने 20 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 193 धावा केल्या. संथ सुरुवातीनंतर काइल मेअर्स याने आक्रमक रुप घेतले. कर्णधार माघारी परतल्यानंतरही काइल मेअर्स याने तुफानी फटकेबाजी केली. काइल मेअर्सच्या फटकेबाजीसमोर दिल्लीची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. दिपक हुड्डासोबत मेर्सने 80 धावांची भागिदारी केली. काइल मेअर्स याने अवघ्या 38 चेंडूत 73 धावांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान काइल मेअर्स याने सात गगनचुंबी षटकार लगावले. तर दोन खणखणीत चौकार मारले. काइल मेअर्स खेळत असताना लखनौ संघ आरामात 200 धावांचा पल्ला पार करेल असे वाटत होते. पण अक्षर पटेल याने काइल मेअर्स याचा अडथळा दूर केला. अक्षर पटेल याने काइल मेअर्स याला क्लीन बोल्ड केले. 

राहुलचा फ्लॉप शो, हुडा-स्टॉयनिसची संथ खेळी - 

मागील काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असणारा राहुल आयपीएलच्या पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. राहुल याला दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. राहुल याने 12 चेंडूत फक्त आठ धावा केल्या. या खेळीदरम्यान राहुलने एक षटकार मारला. राहुलला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याशिवाय दीपक हुड्डा आणि मार्कस स्टॉयनिस यांनी संथ खेळी केली. स्टॉयनिस याने दहा चेंडूत फक्त 12 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने एक षटकार लगावला. तर दीपक हुड्डा याने 18 चेंडूत 17 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याला एकही चौकार अथवा षटकार लगावता आला नाही. क्रृणाल पांड्याला अखेरच्या षटकात धावा काढण्यात अपयश आले. पांड्याने 13 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या. 

निकोलस पूरनची फटकेबाजी, बडोनीचा फिनिशिंग टच  - 

काइल मेअर्स बाद झाल्यानंतर दिल्लीने एकापाठोपाठ एक विकेट गमावल्या होत्या, त्यामुळे धावसंख्या मंदावली होती. त्यावेळी निकोलस पूरन याने फटकेबाजी केली. पूरन याने अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. पूरन याने 21 चेंडूत 36 धावंची खेळी केली. या खेळीदरम्यान पूरन याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. निकोलस पूरन बाद झाल्यानंतर युवा आयुष बडोनी याने फटकेबाजी केली. अखेरच्या षटकात बडोनीने धावांचा पाऊस पाडला. बडोनीने सात चेंडूत दोन षटकार आणि एका चौकारासह 18 धावा केल्या. क्रृष्णाप्पा गौतम याने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावला. 

खलील अहमद सर्वात यशस्वी - 
खलील अहमद याने अचूक टप्प्यावर मारा केला. त्याने लखनौची धावसंख्या  रोखलीच त्याशिवाय त्याने विकेटही घेतल्या. खलील अहमद याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. खलीलने चार षटकात 30 धावा खर्च केल्या.  मुकेश कुमार याने चार षटकात 34 धावा खर्च केल्या.. त्याला एकही विकेट मिळाली. चेतन सकारिया यालाही दोन विकेट मिळाल्या पण त्याला धावा रोखण्यात अपयश आले.

दिल्लीच्या फिरकीपटूची कामगिरी कशी ?

कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या दिल्लीच्या फिरकी जोडगोळीला लखनौच्या धावसंख्येला लगाम लावण्यात अपयश आले. अक्षर पटेल याने 9.50 प्रतिषटक धावा दिल्या तर कुलदीपने 8.75 प्रतिषटक धावा दिल्या. अक्षर पटेल याने चार षटकात एक विकेट घेत 38 धावा दिल्या. तर कुलदीप यादव याने चार षटकात 35 धावा देत एक विकेट घेतल्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं मला देणं घेणं नाही, भुजबळांवर भाष्य टाळलंPrakash Ambedkar Full PC : सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराला मी थांबणार : प्रकाश आंबेडकरAshok Chavan :मी मुख्यमंत्री असतो, तर नांदेडला मंत्रिपद देण्याचा विचार केला असताRajendra Gavit on Cabinet|महायुतीच्या मंत्रिमंडळात आदिवासी आमदारांना स्थान नाही,राजेंद्र गावित नाराज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात टीम इंडिया संकटात, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमधील समन्वयावर सवाल,  दोन मालिकेतील पराभवाचा दाखला 
रोहित अन् गंभीरमधील केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात संकटात,नेमकं काय घडतंय?
Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
Nagpur News : महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
Embed widget