(Source: Poll of Polls)
Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागा
Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागा
2024 Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक यंदा विलक्षण घडामोडींमुळे चर्चेत राहिली. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षांचं फुटलेल्या दोन गटांमुळे सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूंना अस्तित्व जाणवत होतं. पण दुसरीकडे लोकसभा निवडणूक निकालांमध्ये हे दोन्ही पक्ष बाजूला राहून भाजपा व काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्षच क्रमांक एक आणि दोनचे पक्ष ठरले. त्यामुळे लोकसभा निवडणुकांचा परिणाम विधानसभा निवडणूक निकालांवर होण्याचे अंदाज वर्तवले जात असताना काँग्रेस या निवडणुकीत आघाडी घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण एग्झिट पोलमधून मात्र चित्र वेगळंच दिसत असल्यामुळे निकालांबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात १३ जागा जिंकत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये तेवढ्या विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसचं वर्चस्व राहील, असं मानलं जात होतं. पण एग्झिट पोलमध्ये मात्र, याच्या बरोबर उलट चित्र दिसून येत आहे. बहुतांश एग्झिट पोलमध्ये महायुतीला विजयी आघाडी मिळेल, असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. पण आघाडी म्हणून महायुती जरी आघाडीवर असली, तरी पक्षनिहाय तुलनेमध्ये त्यांचं एग्झिट पोलनुसार असणारं स्थान चर्चेचा विषय ठरलं आहे.