Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Maharashtra Exit Polls Result 2024 : हैदराबादस्थित SAS ग्रुपकडून महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 40 ते 42 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जातील, असं म्हटलं आहे.
Maharashtra Exit Polls Result 2024 : राज्यात एकाच टप्प्यातील मतदान आज (20 नोव्हेंबर) किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडले. यानंतर आता विविध वृत्तवाहिन्या आणि खासगी संस्थांकडून EXIT POLL सादर करण्यात आले आहेत. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये निकराची झुंज असल्याचे दिसून आलं आहे. दरम्यान, हैदराबादस्थित SAS ग्रुपकडून महाविकास आघाडी सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 70 पैकी 40 ते 42 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जातील, असं म्हटलं आहे. दुसरीकडे, महायुतीला 27 ते 28 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. हिंदी वृत्तपत्र असलेल्या दैनिक भास्करकडून महाविकास आघाडीला 135 ते 150 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. महायुतीला 125 ते 140 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दैनिक भास्करच्या पोलनुसार भाजपला जास्तीत जास्त 80-90 जागा मिळू शकतात. 2019 मध्ये 105 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस 58-60 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहू शकते. गेल्या निवडणुकीत त्यांना 44 जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीत शरद पवारांची जादू काम करत असल्याचे दिसते. त्यांचा पक्ष 50-55 जागा जिंकू शकतात. शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव गट) 30-35 जागा जिंकून बरोबरीत राहू शकतात. अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीसाठी कमकुवत दुवा ठरत आहे. केवळ 15-20 जागा जिंकण्याची शक्यता आहे. लहान पक्ष आणि अपक्षांना 20 ते 25 जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत तो किंगमेकर बनू शकतो.
दरम्यान, MATRIZE एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे, त्यानुसार महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडी महायुतीला 150-170 जागा मिळतील, MVA ला 110-130 जागा मिळतील आणि इतरांना 8-10 जागा मिळतील असा अंदाज आहे. चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 152 ते 160 जागा मिळतील, महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील, तर इतरांना 6 ते 8 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
तर, JVC च्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 159 जागा मिळतील, MVA ला 116 जागा मिळतील आणि इतरांना 13 जागा मिळतील असा अंदाज आहे. मराठवाड्यातील 46 जागांपैकी महायुतीला 19 जागा, एमव्हीएला 25 आणि इतरांना 2 जागा मिळू शकतात. ठाणे-कोकणात महायुतीला मोठा फायदा होताना दिसत आहे. येथे 39 जागांपैकी महायुतीला 25, एमव्हीएला 11 आणि इतरांना 3 जागा मिळू शकतात.
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत
महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच थेट लढत आहे. महायुतीमध्ये भाजप 149, शिवसेना शिंदे गट 81 तर अजित पवार गट 59 जागांवर निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीमध्ये मध्ये काँग्रेसने 101 जागांवर, शिवसेना ठाकरे गट 95 जागांवर आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने 86 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्राच्या लढाईत बहुजन समाज पक्ष आणि एआयएमआयएमसह छोटे पक्षही आहेत. बसपने 237 तर AIMIM ने 17 उमेदवार उभे केले आहेत. 288 जागांसाठी 4,136 उमेदवार रिंगणात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या