एक्स्प्लोर

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल

कोपरखैरणे येथे भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी अंकूश कदम यांच्यावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

नवी मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान प्रकिया पार पडली. त्यानुसार, राज्यभरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते, त्यामुळे राज्यात एकूण अंदाजे 60 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची माहिती आहे. बीडसह काही जिल्ह्यातील वादाच्या घटना वगळता राज्यात शांततेत आणि उत्साहात मतदान पार पडले. मात्र, मंत्री धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघात काही ठिकाणी राडा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याशिवाय आता ऐरोली (Airoli) विधानसभा मतदारसंघातही माजी खासदार व स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाचे उमेदवार आणि भाजप (BJP) भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे याप्रकरणी ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अंकूश कदम यांच्यावर 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. 

कोपरखैरणे येथे भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी अंकूश कदम यांच्यावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अंकुश कदम यांच्यासह 30 ते 35 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने येथील मतदारसंघात वातावरण तणावाचं बनलं आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होत असून भाजप महायुतीकडून गणेश नाईक हे उमेदवार आहेत. तर, शिवसेना ठाकरे गटाकडून एम.के.मढवी यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. विजय चौगुले हे अपक्ष उमेदवार असून परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीमधील स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम हे आहेत. मात्र, येथील मतदारसंघात राडा झाल्यानंतर अंकुश कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक झाली आहे. भाजप कार्यकर्त्यासोबत झालेल्या मारहाणीतून हा गुन्हा दाखल झाला आहे.  

ऐरोली विधानसभा मतदारसंघातील लढती

गणेश नाईक - भाजप
एम.के.मढवी - शिवसेना ठाकरे
विजय चौगुले - अपक्ष
अंकुश कदम - महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

मतदारसंघाचा इतिहास

ऐरोली विधानसभा मतदारसंघातून 2009 आणि 2014 मध्ये संदीप गणेश नाईक यांना जनतेने विजयी केलं होतं. दोन्ही वेळा संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. संदीप नाईक यांनी शिवसेना उमेदवार विजय चौघुले यांचा पराभव केला होता. पण, 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपने बाजी मारली होती. भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. 

मतदारसंघा कसा आहे?

ऐरोली मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. कळवा आणि ठाणे जवळच्या असलेल्या या मतदारसंघात दलित, मुस्लिम, पाटील आणि यादव या मतदारवर्ग मोठा आहे. 2019च्या आकडेवारीनुसार, ऐरोली मतदारसंघात एकूण 4 लाख 47 हजार 697 मतदार आहेत. यातील 42 हजार 531 दलित, 26 हजार 861 मुस्लिम, 17 हजाराहून अधिक पाटील आणि साडेबारा हजार यादव मतदार आहेत. त्याशिवाय 9 हजाराच्या आसपास राजपूत आणि 8 हजाराच्या जवळपास आदिवासी मतदार आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget