सूर्याचं धडाकेबाज शतक भारी की राशिद खानची वादळी खेळी, सामनावीर कोण ठरवते ?
Aakash Chopra on POTM Award: मुंबईने सामन्यात बाजी मारल्यानंतर सूर्यकुमार यादव याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Aakash Chopra on POTM Award: वानखेडे मैदानावर मुंबईने गुजरातचा पराभव करत प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवले. सूर्यकुमार यादव याने वादळी शतक ठोकले.. पण प्रत्युत्तर दाखल मैदानवर उतरलेल्या गुजरात संघाकडून राशीद खान याने आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली.. गुजरातने सामना गमावला पण राशीद खान याने मने जिंकली. राशिद खान याने गोलंदाजीत चार विकेट घेतल्या. तर फलंदाजी करताना नाबाद ७९ धावांची खेळी केली. सामन्यानंतर सोशल मीडियावर सामनावीर कोण? यावरुन वाद सुरु झाला. अनेकांनी सामनावीर पुरस्कार राशिद खान याला द्यायला हवा होता.. अशी मागणी केली. यामध्ये माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथ याचाही समावेश होता. सामनावीर पुरस्कार कोण देते.. यावर प्रश्न विचारण्यात येत आहे. समालोचक आणि माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी सामनावीर पुरस्कार कोण ठरवते.. याबाबतची माहिती दिली..
काय म्हटले आकाश चोप्राने -
भारताचा माजी खेळाडू आणि विद्यमान समालोचक आकाश चोप्रा यांनी सामनावीर पुरस्काराची निवड कोण करते.. याबाबतची माहिती दिली.. आकाश चोप्रा यांच्या मते इंग्रजी कॉमेंट्री करणाऱ्यापैकी एकजण समानाीर पुरस्कार कुणाला द्यायचा त्याची निवड करतो.
ट्वीट काय आहे...
प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार कुणाला द्यायचे हे कोण ठरवते, याचा विचार खूपजण करत आहेत. इंग्रजी कॉमेंट्री करणाऱ्यापैकी एकाला हे काम दिले जातेय..नेहमी तो व्यक्तीच हा पुरस्कार कुणाला द्यायचा हे ठरतो.
Those who keep wondering how and who decides the POTM award…there’s ONE commentator from the World Feed (English) who’s nominated to be the adjudicator for every game. So, it’s always down to just ‘that’ person to decide who gets the award. ✌️
— Aakash Chopra (@cricketaakash) May 13, 2023
Suryakumar Yadav grabs the Player Of The Match award for his marvelous century.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 12, 2023
A tough competition between him and Rashid Khan for the POTM award. pic.twitter.com/eV3Cg8x5dF
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार द्विपक्षीय मालिका अथवा छोट्या स्पर्धेमध्येही अशीच प्रक्रिया आहे. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत यासाठी खास पॅनल तयार करण्यात येते. त्यामध्ये मॅच रेफरी आणि माजी खेळाडूंचा समावेश असतो.
मुंबईने सामन्यात बाजी मारल्यानंतर सूर्यकुमार यादव याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावरुन सोशल मीडियात काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. सूर्यकुमार यादवची खेळी चांगली होती.. पण राशिद खान याची कामगिरी त्याच्यापेक्षा चांगली होती. राशिद खान सामनवीर पुरस्काराचा खरा हक्कदार आहे.. यासारख्या पोस्टचा धुमाकूळ होतोय. खरा सामनावीर कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
