IPL 2022: यंदाच्या हंगामात 'हे' स्टार फलंदाज अर्धशतक करण्यास अपयशी, नाव वाचून बसेल धक्का!
IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. येत्या 29 मे रोजी आयपीएल 2022 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे.
IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. येत्या 29 मे रोजी आयपीएल 2022 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सच्या संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार पहिला संघ ठरला आहे. लवकरच प्लेऑफचं गणित स्पष्ट होईल. लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांना प्लोऑफसाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. यंदाच्या हंगामात अनेक फलंदाजांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. तर अनेक स्टार फलंदाजांना यंदाच्या हंगामात एकही अर्धशतक करता आलं नाही. या यादीत दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) , मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), गुजरातचा तडाखेबाज फलंदाज राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आणि मुंबईचा आक्रमक फलंदाज कायरन पोलार्डसह (Kieron Pollard) चेन्नईचा रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) यांच्या नावाचा समावेश आहे.
ऋषभ पंत
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत यंदाच्या हंगामात बॅट शांत दिसली. त्यानं 12 सामन्यांच्या 11 डावात 32.67 च्या सरासरीनं आणि 156.38 च्या स्ट्राईक रेटनं 294 धावा केल्या आहेत. ज्यात 31 चौकार आणि 14 षटकारांचा समावेश आहे. मात्र, या हंगामात त्याला एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. यंदाच्या हंगामात त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 44 धावा आहे.
राहुल तेवतिया
गुजरात टायटन्ससाठी फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या राहुलनं यंदाच्या हंगामात अनेक सामन्यांमध्ये गुजरातला एकहाती विजय मिळवून दिला आहे. त्यानं आयपीएल 2022 च्या 12 सामन्यांमध्ये 11 डावात 35.83 च्या सरासरीनं 215 धावा केल्या आहेत. तेवतियानं या हंगामात एकही अर्धशतक झळकावलेलं नाही. यंदाच्या हंगामात त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 43 धावा आहे. तेवतियानं पंजाब किंग्जविरुद्ध शेवटच्या दोन चेंडूत 2 षटकार मारून गुजरातला विजय मिळवून दिला होता. ज्यामुळं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.
रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे.एक-दोन सामने वगळले तर, त्याला मोठी धाव संख्या उभारता आली नाही. रोहितनं 12 सामन्यांच्या 12 डावात 18.17 च्या सरासरीनं आणि 125.28 च्या स्ट्राईक रेटनं 218 धावा केल्या आहेत. ज्यात एकही अर्धशतक नाही. आयपीएल 2022 मध्ये त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 43 धावा आहे.
कायरन पोलार्ड
मुंबईचा आक्रमक फलंदाज कायरन पोलार्डनं यंदाच्या हंगामात 11 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 14.40 च्या सरासरीनं 144 धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात त्याच्या नावावर एकही अर्धशतकाची नोंद नाही. आयपीएल 2022 मध्ये त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 25 धावा आहे.
रवींद्र जडेजा
रवींद जाडेजासाठी यंदाचा हंगाम खूप खराब ठरला आहे. फलंदाजीसह गोलंदाजीतही त्यानं निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यानं चेन्नईसाठी 10 सामने खेळले आहेत. ज्यात 19.33 च्या सरासरीनं 116 धावा केल्या आहेत. चेन्नईच्या संघाचा हुकमाच एक्का म्हणून ओळखला जाणाऱ्या रवींद्र जाडेजाला यंदाच्या हंगामात एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. तर, या सामन्यात त्यानं 7.51 च्या इकोनॉमीनं फक्त पाच विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, दुखापतीमुळं रवींद्र जाडेजा आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
हे देखील वाचा-