IPL 2022: 'हे' पाच खेळाडू ठरलेत गुजरातच्या विजयाचे शिल्पकार
IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स (Gujarat Titans) हा प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे.
IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स (Gujarat Titans) हा प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातनं आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यापैकी नऊ सामन्यात विजय मिळवला आहे. तर, तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. गुजरातचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यंदाच्या हंगामात गुजरातच्या काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. ज्यात शुभमन गिल, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी, राशिद खान आणि राहुल तेवतिया यांचा समावेश आहे.
1) शुभमन गिल
शुभमन गिलनं यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्सकडून 12 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 34. 91 च्या सरासरीनं आणि 137 च्या स्ट्राईक रेटनं 384 धावा केल्या आहेत. यादरम्यान, शुभमन गिलच्या बॅटनं चार अर्धशतक झळकली आहेत. आयपीएल 2022 मधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 96 आहे. गिलनं गुजरातला अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली आहे.
2) डेव्हिड मिलर
गुजरातचा मधल्या फळीचा फलंदाज डेव्हिड मिलरसाठी यंदाचा हंगाम खास ठरला आहे. त्यानं आयपीएल 2022 मध्ये 12 सामन्यात 55.33 च्या सरासरीनं 332 धावा केल्या आहेत. मिलरनं यंदाच्या हंगामात एक अर्धशतक झळकावलं आहे. आयपीएल 2022 मधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 94 आहे.
3) राहुल तेवतिया
गुजरातच्या संघासाठी फिनिशरची भूमिका बजावणारा राहुल तेवतिया एकट्याच्या जोरावर संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. यंदाच्या हंगामात त्यानं 12 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 35. 83 च्या सरासरीनं 215 धावा केल्या आहेत. आयपीएल 2022 मधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 43 आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात 2 चेंडूत 12 धावा असताना त्यानं दोन षटकार मारून गुजरातला विजय मिळवून दिला होता.
4) मोहम्मद शमी
गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. पॉवरप्लेमध्ये त्यानं शानदार गोलंदाजी केली आहे. शमीनं 12 सामन्यात 7.87 च्या इकॉनॉमी आणि 23.12 च्या सरासरीनं 16 विकेट घेतल्या आहेत. 25/3 ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी आहे. शमीनं आतापर्यंत 47 षटके टाकली असून 370 धावा दिल्या आहेत.
5) राशिद खान
गुजरात टायटन्सचा उपकर्णधार आणि फिरकीपटू राशिद खाननं यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. त्याच्या गोलंदाजीसमोर अनेक दिग्गज फलंदाजांनी गुडघे टेकल्याचं आपणांस पाहायला मिळालं आहे. राशिदनं यंदाच्या हंगामातील 15 सामन्यात 6.79 च्या इकोनॉमी रेटनं 15 विकेट्स घेतल्या आहेत. 24/4 ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी आहे. राशिद खाननं आतापर्यंत 47.5 षटके टाकली असून 325 खर्च केल्या आहेत.
हे देखील वाचा-