(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR vs SRH: कोलकात्यासाठी 'करो या मरो'ची लढत, अशी मिळू शकते प्लेऑफमध्ये जागा
IPL 2022 Playoffs: आयपीएलचा पंधरावा हंगामात अंतिम टप्प्यावर पोहचला आहे. यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये जागा मिळवणारा पहिला संघ ठरला आहे.
IPL 2022 Playoffs: आयपीएलचा पंधरावा हंगामात अंतिम टप्प्यावर पोहचला आहे. यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये जागा मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालाय. तर, उर्वरित तीन जागांसाठी सात संघामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कोलकाता नाईट रायडर्स यांचादेखील समावेश आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कोलकात्याच्या संघानं 12 सामने खेळले आहेत. त्यापैकी सात सामने गमावले आहेत. तर, पाच सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकात्याचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कोलकात्याचा संघ सर्वात खाली आहे. प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी कोलकात्याच्या संघाला त्याचे पुढील दोन्ही सामन्या मोठ्या रनरेटनं जिंकणं गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे, हे दोन्ही सामने जिंकल्यानंतरही कोलकात्याला इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. तर, प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी कोलकात्याचं समीकरण कसं असणार? यावर एक नजर टाकुयात.
कोलकात्यासाठी प्लेऑफचं समीकरण कसं असेल?
- कोलकात्याचा संघ आज हैदराबादशी भिडणार आहे. त्यानंतर त्यांचा या हंगामातील अखेरचा सामना लखनौ सुपर जायंट्स यांच्याशी होणार आहे. या दोन्ही सामन्यात कोलकात्याला मोठ्या रनरेटनं विजय मिळवणं गरजेचं आहे.
- आरसीबी त्यांच्या पुढील सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभूत झाली पाहिजे. या पराभवानमुळं आरसीबीचे 14 गुण होतील.
- दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभूत होणं गरजेचं आहे. दिल्लीचे पुढील दोन सामने पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्याशी होणार आहे.
- पंजाब किंग्जलाही त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभव होणं कोलकात्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. पंजाब त्यांचे पुढील दोन सामने दिल्ली आणि हैदराबादशी खेळणार आहे.
हे देखील वाचा-