IPL 2022: 'या' गोलंदाजांची चर्चा! यंदाच्या हंगामात सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम, टॉप 5 मध्ये चार भारतीय
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळं संघ सातत्यानं चांगली कामगिरी करत आहेत.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळं संघ सातत्यानं चांगली कामगिरी करत आहेत. त्याचबरोबर यंदाच्या हंगामात काही गोलंदाजांनी अनेकवेळा मेडन ओव्हरही टाकल्या आहेत. तर, यंदाच्या हंगामात कोणत्या गोलंदाजांनं सर्वाधिक मेडन ओव्हर (IPL 2022 Most Maiden Overs) टाकल्या आहेत? त्या गोलंदाजांची नाव जाणून घेऊयात.
प्रसिद्ध कृष्णा
राजस्थानच्या या युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णानं यंदाच्या हंगामात 12 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यानं 47 षटके टाकली आहेत. ज्यामध्ये त्यानं तीन वेळा मेडन ओव्हर टाकली आहे. तसेच 13 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक मेडन ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
मोहसीन खान
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात युवा गोलंदाज मोहसीन खान लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचं नेतृत्व करत आहे. दरम्यान, त्यानं आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यंदाच्या हंगामात त्यानं आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं मेडन ओव्हर आणि 10 विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंट बोल्ट
या यादीत राजस्थान रॉयल्सचा आणखी एक गोलंदाज आहे. राजस्थान वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं 11 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 10 विकेट्स आणि दोन मेडन ओव्हर टाकले आहेत.
उमेश यादव
उमेश यादवनं या हंगामात आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात त्यानं 11 सामन्यात 44 षटके टाकली आहेत. यादरम्यान त्यानं दोन मेडन षटक टाकली आहे.
जसप्रीत बुमराह
या यादीत मुंबई इंडियन्सचा आक्रमक गोलंदाज जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर आहे. त्यानं 12 सामन्यात 45.2 षटके टाकली आहेत. यादरम्यान त्याने 2 मेडन ओव्हर टाकली आहेत. या हंगामात बुमराहनं आतापर्यंत 11 विकेट घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-