RCB vs GT: फक्त 57 धावा अन् विराटच्या नावावर होणार खास विक्रम
IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये वानखेडेच्या मैदानावर आयपीएलमधील 67 वा सामना रंगणार आहे.
Virat Kohli, Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये वानखेडेच्या मैदानावर आयपीएलमधील 67 वा सामना रंगणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील गुजरात टायटन्सने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केलेय. पण फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीला प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय गरजेचाच आहे. गुणतालिकेत गुजरात अव्वल तर आरसीबीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. टॉप 4 मध्ये पोहचण्यासाठी आणि प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी आरसीबीला विजय अनिवार्य आहे. या सामन्यात विराट कोहलीला खास विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीने 57 धावा केल्यानंतर मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. 57 धावा करताच विराट कोहली नव्या विक्रमाला गवसणी घालणार आहे.
फक्त 57 धावा अन् विराटच्या नावावर खास विक्रम -
आयपीएलचा 15 वा हंगाम विराट कोहलीसाठी खास राहिला नाही. यंदाच्या हंगामात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली तीन वेळा गोल्डन डकचा शिकार झालाय. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने आज 57 धावा केल्यानंतर इतिहास रचू शकतो. आरसीबीसाठी विराट कोहलीने 6943 धावा (चॅम्पियन लीगमधील धावा) केल्या आहेत. विराट कोहलीने आज 57 धावा केल्यास आरसीबीकडून सात हजार धावा करणारा खेळाडू ठरु शकतो. असा कारनामा करणारा पहिलाच खेळाडू होण्याचा मानही विराटला मिळू शकतो.
विराट कोहलीची कामगिरी -
यंदाच्या हंगामात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. 13 सामन्यात कोहलीला फक्त 236 धावा काढता आल्यात. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीचा सर्वोत्कृष्ट धावसंख्या 58 आहे. विराट कोहलीला मोठ्या सामन्याचा खेळाडू म्हणून ओळखले जाते... अशात आज विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची आपेक्षा आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा (चॅम्पियन्स लीगमधील धावा सोडून)
विराट कोहली: 6519 धावा
शिखर धवन: 6205 धावा
रोहित शर्मा: 5877 धावा
डेविड वॉर्नर: 5876 धावा
सुरेश रैना: 5528 धावा