(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ENG vs IND Test: पाच महिन्यानंतर पुजाराचं पुनरागमन, कसं मिळवलं भारतीय कसोटी संघाचं तिकीट?
ENG vs IND Test: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
ENG vs IND Test: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) पाच महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. यापूर्वी तो जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर पुजाराला खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत तो टीम इंडियाचा भाग नव्हता आणि त्याच्या जागी हनुमा विहारीला संधी देण्यात आली होती. आता पुन्हा पुजाराचा संघात समावेश करण्यात आलाय.
चेतेश्वर पुजारानं काउंटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली. काउंटी क्रिकेटमध्ये ससेक्सकडून खेळताना पुजारानं दोन द्विशतक आणि दोन शतक ठोकले. या सामन्यात त्यानं 143. 40 च्या सरासरीनं चार सामन्यातील सात डावात 717 धावा केल्या होत्या. ज्यामुळं त्याला भारतीय संघात संधी मिळणार हे नक्की होतं.
काउंटी क्रिकेटमध्ये पुजाराची दमदार कामगिरी
काउंटी क्रिकेटमधील डर्बीशायरविरुद्ध पहिल्याच सामन्यात नाबाद 201 धावांची खेळी केली. त्यानंतर यॉर्कशायरविरुद्ध 109 आणि डरहमविरुद्ध 203 धावा ठोकल्या. यानंतर त्यानं मिडलसेक्सविरुद्धही शतक झळकावलं. या सामन्याच्या पहिल्या डावात त्यानं 10 चेंडूत 16 धावा केल्या, मात्र दुसऱ्या डावात त्यानं शानदार शतक केलं. चार सामन्यांत चार शतके केल्यानंतर पुजाराकडे दुर्लक्ष करणे निवड समितीसाठी कठीण होतं.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
इंग्लंड दौऱ्यात भारतीय कसोटी संघात चेतेश्वर पुजाराला स्थान मिळाल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी भाष्य केलं आहे. पुजाराचा फॉर्म भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल. कसोटी क्रिकेटमध्ये पुजारानं आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघाचा चांगल्या फलंदाजाची गरज होती. काऊंटी क्रिकेटमध्ये पुजाराचा स्ट्राईक रेट चांगला होता. तो फॉर्ममध्ये आहे, त्यामुळं त्याच्या चांगल्या फॉर्मचा फायदा घेतला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हे देखील वाचा-