(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PKBS Vs GT, IPL 2022: लियाम लिव्हिंगस्टोनपुढे फिके पडले गोलंदाज, पंजाबचं गुजरातसमोर 190 धावांचं लक्ष्य
PKBS Vs GT, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळावा सामना पंजाब विरूद्ध गुजरात यांच्यात खेळला जात आहे.
PKBS Vs GT, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळावा सामना पंजाब विरूद्ध गुजरात यांच्यात खेळला जात आहे. आयपीएलच्या या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरूद्ध लढत आहेत. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाबच्या संघानं 20 षटकात 9 विकेट्स गमावून गुजरात समोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोन वादळी खेळी केली.
नाणेफेक गमवल्यानंतर मैदानात आलेल्या पंजाबच्या संघाची सुरुवात खराब झाली. पंजाबनं दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पहिली विकेट्स गमावली. त्यानंतर जॉनी बेअरस्टोनंही स्वस्तात माघारी परतला. दरम्यान, शिखर धवननं संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. पंजाबनं दोन विकेट्स गमवल्यानंतर मैदानात आलेल्या लियान लिव्हिंगस्टोननं आक्रमक फलंदाजी करत संघाचा स्कोर पुढे नेला. परंतु, दहाव्या षटकात राशीद खाननं शिखर धवनला बाद केलं. या सामन्यात ओडियन स्मिथ मोठी धावसंख्या उभी करेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, तो शून्यावर बाद झाल्यानं पंजाबचे चाहते नाराज झाले. त्यानंतर सोळाव्या षटकात राशिद खानं लिव्हिंगस्टोनला आक्रमक खेळी संपुष्टात आणली. अखेरच्या दोन षटकात फलंदाजी करत राहुल चहरनं 14 बॉलमध्ये 22 धावांची खेळी केली. तर, अर्शदीप सिंहनं पाच चेंडूत दहा धावा केल्या. ज्यामुळं पंजाबनं गुजरात समोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं.
संघ-
पंजाबचा संघ
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.
गुजरातचा संघ
मॅथ्यू वेड (विकेटकिपर), शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे.
हे देखील वाचा-