PBKS vs GT: हार्दिकनं टॉस जिंकला, गुजरातचा संघ प्रथम गोलंदाजी करणार
PBKS vs GT: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पंधराव्या सामन्यात पंजाब आणि गुजरात यांच्यात सामना रंगाणार आहे.
PBKS vs GT: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पंधराव्या सामन्यात पंजाब आणि गुजरात यांच्यात सामना रंगाणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गुजरातच्या संघाचं नेतृत्व भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या करत आहेत. तर, पंजाबच्या संघाची जबाबदारी मयांक अग्रवालच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या हंगामात दोन्ही संघानं चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी बजावतात? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
पंजाब आणि गुजरात यांच्यात आज होणारा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. या सामन्याच्या निमित्तानं दोन्ही युवा कर्णधार आमने-सामने येणार आहेत. गुजरातनं आपल्या पहिल्याच सामन्यात लखनौचा पाच गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर दिल्लीला 14 धावांनी पराभूत केलं. दुसरीकडं पंजाबनं पहिल्या सामन्यात आरसीबीवर पाच विकेट्सनं विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कोलकात्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र, तिसऱ्या सामन्यात चेन्नईचा 54 धावांनी पराभव करत पुनारागमन केलंय.
गुजरातविरुद्ध पंजाबनं निवडलेला 'या' 11 खेळाडूंचा संघ
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.
गुजरातचे 'हे' 11 शिलेदार देणार पंजाबला टक्कर
मॅथ्यू वेड (विकेटकिपर), शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे.
हे देखील वाचा-