Bangladesh Win : बांग्लादेशची दमदार कामगिरी! दक्षिण आफ्रिकेत जाऊन मिळवला मालिका विजय
बांग्लादेशने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीत जात एकदिवसीय मालिकेत 3-1 ने मात दिली आहे.
SA vs BAN : बांग्लादेशने (Bangladesh Cricket Team) सेंचुरियनमध्ये खेळवलेल्या मालिकेतील तिसऱ्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 9 विकेट्सने मात दिली आहे. त्यामुळे या विजयासह त्यांनी पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेवर त्यांच्याच भूमीत जात मालिकाविजय मिळवला आहे.बांग्लादेशने आजचा सामना 9 विकेट्सने जिंकत मालिकाविजय मिळवला आहे.
याआधीच्या दोन एकदिवसीय सामन्यांचा विचार करता पहिला सामना बांग्लादेशने 38 धावांनी जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट्सनी विजय मिळवला होता. ज्यामुळे आता आजचा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक होता. दरम्यान या सामन्य़ात सुरुवातीपासून बांग्लादेशने सामन्यावर वर्चस्व कायम ठेवलं. सामन्यात बांग्लादेशने आधी गोलंदाजी करत तस्कीन अहमदच्या पाच विकेट्सच्या जोरावर दक्षिण आफ्रीकेला 37 ओव्हरमध्ये 154 धावांवर सर्वबाद केलं. ज्यानंतर केवळ 26.3 ओव्हरमध्ये एक विकेट गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं. संघाचा कर्णधार तमीम इकबालने नाबाद 87 तर लिंटन दासने 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यामुळे 9 विकेट्सने सामना जिंकत मालिकाही बांग्लादेशने नावावर केली आहे.
हे ही वाचा-
- India W vs Bangladesh W : भारतीय महिला संघाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय, 110 धावांनी जिंकला सामना
- Gujrat Titans Team Preview : पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरण्यासाठी गुजरात टायटन्स सज्ज, हार्दिकच्या टोळीची काय ताकद? काय कमजोरी?
- RCB Team Preview IPL 2022 : सर्वोत्तम फलंदाज, दर्जेदार गोलंदाज; आरसीबी आता तरी चषक उंचवणार का?
- IPL 2022 : कर्णधार आणि माजी कर्णधार करतील आरसीबीकडून ओपनिंग, अशी असेल बंगळुरुची अंतिम 11
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live