एक्स्प्लोर

KKR vs DC Result : टेबल टॉपर केकेआर पराभूत, दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीकडून 44 धावांनी पराभव

IPL 2022, KKR vs DC : मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात पार पडणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात दिल्लीने केकेआरला 44 धावांनी मात दिली आहे.

KKR vs DC, Result :  दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) या आजच्या सामन्यात दिल्लीने आधी तुफान फटकेबाजी आणि नंतर भेदक गोलंदाजीच्या जोरावर टेबल टॉपर कोलकाता नाईट रायडर्सला 44 धावांनी मात दिली आहे. दिल्लीकडून वॉर्नर-पृथ्वीने अर्धशतक झळकावलं, तर कुलदीप यादवने 4, खलील अहमदने 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. केकेआरकडून कर्णधार श्रेयस अय्यरची 51 धावांची अर्धशतकी एकाकी झुंज मात्र व्यर्थ ठरली. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 216 धावांचे तगडे लक्ष्य केकेआरसमोर ठेवले तर केकेआरला 20 षटकात 171 धावांवर रोखले.

आयपीएलच्या आजच्या सामन्यात सुरुवातीला नाणेफेक जिंकत केकेआरने गोलंदाजी निवडली. पण दिल्लीच्या फलंदाजांनी केकेआरचा हा निर्णय़ चूकीचा ठरवत एका दमदार खेळीचं दर्शन घडवलं. दिल्लीकडून पृथ्वीने 29 चेंडूत 51 धावांची, तर व़ॉर्नरने 45 चेंडूत 61 धावांची अर्धशतकी खेळी केली. पंतने 27 धावा, तर अखेरच्या काही षटकात अक्षर पटेल (22) आणि शार्दूल ठाकूरने (29) तुफान फटकेबाजी करत संघाचा स्कोर 200 पार पोहोवला. आता केकेआरला विजयासाठी 20 षटकात 216 धावांची गरज होती. केकेआरकडून नारायणने दोन तर वरुण, रसेल आणि उमेशने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

ज्यानंतर केकेआरचे गडी सुरुवातीपासून तंबूत परत होते. वेंकटेश आणि रहाणे स्वस्तात बाद झाल्यानंतर नितीश राणा आणि कर्णधार श्रेयसने डाव सांभाळला पण राणा 30 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर अखेरपर्यंत श्रेयसला खास साथ मिळाली नाही. तोही 51 धावा करुन तंबूत परतला. रसेलने 24 आणि सॅमने 15 धावांची खेळी केली, ज्यानंतरच्या इतरांना दुहेरी संख्याही गाठता न आल्याने संघाचा डाव 8 विकेट्सवर 171 धावांवर आटोपला. दिल्लीकडून कुलदीप यादवने 4, खलील अहमदने 3, शार्दूलने 2 तर ललिलतने एक विकेट घेतली.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले

मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 

Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC Beed | मी कुणाच्या बापाला भीत नाही, सुरेश धसांची आक्रमक पत्रकार परिषदABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सUday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार

स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास

पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त

Embed widget