एक्स्प्लोर

RCB Vs MI: मुंबईचा सलग चौथा पराभव, बंगळुरूनं 7 विकेट्स राखून सामना जिंकला

IPL 2022: या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बंगळुरुच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरुच्या संघानं सात विकेट्स राखून मुंबईला पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बंगळुरुच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघानं सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोदावर बंगळुरूसमोर 152 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघानं 9 चेंडू शिल्लक ठेवत हे लक्ष्य पूर्ण केलं. बंगळुरूच्या विजयात अनुज रावतनं महत्वाची भूमिका बजावली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात धीमी झाली. तसेच सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूत कर्णधार रोहित शर्मानं त्याची विकेट गमावली. दरम्यान, फलंदाजी करण्यासाठी आलेला डेवाल्ड ब्रेविसलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर वानिंदु हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानं 11 चेंडूत 11 धावा केल्या. त्यानंतर सुर्यकुमार यादवनं संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. परंतु, दहाव्या षटकात ईशान किशनही बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि पोलार्ड शून्यावर बाद होऊन माघारी परतले. रमनदीप सिंहलाही (6 धावा) या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर सुर्यकुमार यादवनं उनादकटला सोबत संघाची धावसंख्या 151 धावांवर पोहचवली. बंगळुरूकडून वानिंदु हसरंगा आणि हर्षल पटेलनं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, आकाश दीपला एक विकेट्स मिळाली. 

या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बंगळुरूकडून मैदानात उतरलेल्या फाफ डू प्लेसिस आणि अनूज रावतनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, आठव्या षटकातील पहिल्याच चेंडूत फाफ डू प्लेसिसनं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर विराट कोहली मैदानात आला. विराट आणि अनुज रावतनं चांगली फलंदाजी करत संघाचा शंभर पार पोहचवला. मात्र, सोळाव्या षटकातील पाचव्या चेंडूत रावत रनआऊट झाला. त्यानं 47 चेंडूत 66 धावा केल्या. त्यानंतर आठराव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीही बाद झाला. त्यानं 36 चेंडूत 48 धावा केल्या. दरम्यान, दिनेश कार्तिकनं 7 आणि ग्लेन मॅक्सवेलनं 8 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. मुंबईकडून डेवॉल्ड ब्रेविस आणि जयदेव उनादकटनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh On Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पटेवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पटेवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Embed widget