IPL 2022 : दिल्ली आणि कोलकाता सामन्यात दिसलेली ही सुंदरी कोण?, रातोरात झाली सोशल मीडियावर प्रसिद्ध
IPL 2022, DC vs KKR: दिल्ली संघाने कोलकाता विरुद्ध दमदार प्रदर्शन करत सामना 44 धावांनी जिंकला, पण सामन्यादरम्यान सर्वांचेच लक्ष्य एका तरुणीने वेधून घेतले होते.
IPL 2022 : आयपीएल (IPL) एक अशी स्पर्धा आहे, ज्यामध्ये खेळाडूंच्या दमदार खेळीमुळे खेळाडू प्रसिद्ध होतातच पण सोबतच सामना पाहायला आलेले प्रेक्षकही कधी-कधी फेमस होत असतात. रविवारी पार पडलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) सामन्यात देखील एका मुलीने अशाचप्रकारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामन्यादरम्यान कॅमेरामनने प्रेक्षकांना दाखवताना बऱ्याचदा एका मुलीकडे फोकस ठेवला, दिसायला अतिशय सुंदर असलेल्या या मुलीचे अनेक फोटोज यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले. विविध मीम्स देखील या मुलीबाबत व्हायरल होत आहेत.
सामन्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या मुलीचे फोटो शेअर करत विविध रिएक्शन त्यावर दिले. त्यानंतक काही नेटकऱ्यांनी तिच्याबाबत शोध घेतल्यानंतर तिचं नाव आरती बेदी असं असल्याचं समोर आलं. ती इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असून 50 हजारांच्या घरात तिचे फॉलोवर्स आहेत. तिने बायोमध्ये अॅक्टर असं लिहिलं असल्याने ती अभिनय क्षेत्रात सक्रिय असू शकते.
असा पार पडला सामना
आयपीएलच्या केकेआर विरुद्ध दिल्ली सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरने गोलंदाजी निवडली. पण दिल्लीच्या फलंदाजांनी केकेआरचा हा निर्णय़ चूकीचा ठरवत एका दमदार खेळीचं दर्शन घडवलं. दिल्लीकडून पृथ्वीने 29 चेंडूत 51 धावांची, तर व़ॉर्नरने 45 चेंडूत 61 धावांची अर्धशतकी खेळी केली. पंतने 27 धावा, तर अखेरच्या काही षटकात अक्षर पटेल (22) आणि शार्दूल ठाकूरने (29) तुफान फटकेबाजी करत संघाचा स्कोर 200 पार पोहोवला. आता केकेआरला विजयासाठी 20 षटकात 216 धावांची गरज होती. केकेआरकडून नारायणने दोन तर वरुण, रसेल आणि उमेशने प्रत्येकी एक विकेट घेतली.
ज्यानंतर केकेआरचे गडी सुरुवातीपासून तंबूत परत होते. वेंकटेश आणि रहाणे स्वस्तात बाद झाल्यानंतर नितीश राणा आणि कर्णधार श्रेयसने डाव सांभाळला पण राणा 30 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर अखेरपर्यंत श्रेयसला खास साथ मिळाली नाही. तोही 51 धावा करुन तंबूत परतला. रसेलने 24 आणि सॅमने 15 धावांची खेळी केली, ज्यानंतरच्या इतरांना दुहेरी संख्याही गाठता न आल्याने संघाचा डाव 8 विकेट्सवर 171 धावांवर आटोपला. दिल्लीकडून कुलदीप यादवने 4, खलील अहमदने 3, शार्दूलने 2 तर ललिलतने एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- KKR vs DC Top 10 Key Points : दिल्लीचा कोलकात्यावर 44 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- KKR vs DC Result : टेबल टॉपर केकेआर पराभूत, दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीकडून 44 धावांनी पराभव
- CSK vs SRH Top 10 Key Points : हैदराबादचा चेन्नईवर दमदार विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha