एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

IPL 2021 : आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन इंग्लंडमध्ये? ब्रिटीश काउंटीचा प्रस्ताव

IPL 2021 : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा 14वा सीझन रद्द करण्यात आलं आहे. अशातच आता आयपीएलचे उर्वरित सामने कधी, कुठे आणि केव्हा खेळवण्यात येणार? हा प्रश्न सर्वांच्याच मनात होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रिटीश काउंटीनं आयपीएलच्या आयोजनासंदर्भात बीसीसीआयसमोर प्रस्ताव ठेवला आहे.

IPL 2021 : आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनिश्चित काळासाठी आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. तसेच सप्टेंबरमध्ये आयपीएलचं आयोजन पुन्हा केलं जाईल, असं सांगितलं जात आहे. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज झालेले चाहत्यांना आयपीएलचं आयोजन पुन्हा कधी, केव्हा आणि कुठे करण्यात येणार याबाबत उत्सुकताही आहे. अशातच आयपीएलच्या आयोजनाबाबत मोठी बातमी हाती आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन इंग्लंडमध्ये केलं जाऊ शकतं. आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन करण्यासाठी इंग्लिश काउंटीच्या वतीनं बीसीसीआयला प्रस्ताव देण्यात आला आहे.  

आयपीएलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर IPL रद्द 

दरम्यान, आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये आतापर्यंत 29 सामने पार पडले होते. त्यानंतर काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता आयपीएलचं आयोजन होणार का? झालं तर कुठे होणार आणि कधी होणार? यांसारखे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात आहेत. 4 मेरोजी मंगळवारी आयपीएल गवर्निंग काउंसिलची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत बीसीसीआयनं आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बायो बबलमध्ये असूनही कोरोनाची लागण झाल्यानं बीसीसीआयच्या वतीनं आयपीएलचे उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

इंग्लिश काउंटीचा आयपीएलच्या आयोजनासाठी प्रस्ताव  

मीडिया रिपोर्टनुसार, इंग्लिश काउंटीच्या एका ग्रुपने यंदाच्या आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन सप्टेंबरमध्ये करण्याचा प्रस्ताव दिला आहे.  ESPNcricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, एमसीसी, सर्रे, वार्विकशायर आणि लंकशायरने ईसीबीला एक पत्र पाठवलं आहे. या लेटरमध्ये यंदाच्या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उर्वरित सामने इंग्लंडमध्ये खेळवण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. 

आयसीसी विश्वचषकापूर्वी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन? 

दरम्यान, इंडियन टीम यंदाच्या वर्षी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये टीम इंडियाद्वारे इंग्लंडच्या विरोधात 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. अशातच अंदाज वर्तवण्यात येत आहे की, इंग्लंड विरोधातील कसोटी मालिका पार पडली की, आयसीसी विश्वचषकापूर्वी टीम इंडियाकडे वेळ असणार आहे. त्यामुळे यादरम्यान आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन केलं जाऊ शकतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget