रोवमन पॉवेलकडे कर्णधार, रसेल-पूरनची एन्ट्री, विश्वचषकासाठी विडिंजच्या संघाची घोषणा
T20 World Cup 2024 West Indies Squad: आगामी टी20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा कऱण्यात आली.
T20 World Cup 2024 : आगामी टी20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजच्या संघाची (T20 World Cup 2024 West Indies Squad) घोषणा कऱण्यात आली. रोवमन पॉवेल याच्याकडे विडिंजच्या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. आंद्रे रसेल आणि निकोलस पूरन यासारख्या विस्फोटक खेळाडूचा समावेश कऱण्यात आला आहे. अल्जारी जोसेफ याच्याकडे विडिंजच्या संघाचं उपकर्णधारपद देण्यातआ लेय. टी20 विश्वचषकाच्या संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. 2022 टी20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचा संघ क्वालिफाय झाला नव्हता. पण यंदा यजमानपद आल्यामुळे विडिंजचा संघ डायरेक्ट क्वालिफाय झाला आहे.
WEST INDIES T20 WORLD CUP SQUAD 🏆
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 3, 2024
Powell (C), Russell, Pooran, Hetmyer, Joseph, Charles, Chase, Holder, Hope, Akeal Hossain, Shamar, King, Motie, Rutherford and Shepherd. pic.twitter.com/7dChJijmYk
वेस्ट इंडिजच्या संघात अनुभवी आणि नवख्या खेळाडूंचा भरणा करण्यात आला आहे. युवा वेगवान गोलंदाज शमार जोसेफ याला संधी देण्यात आली आहे. शमार जोसेफ यानं वेस्ट इंडिजमध्ये आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. त्यावेळी जोसेफ यांनी शानदार कामगिरी केली. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टीकू दिलं नाही. अनुभवी शिमरॉन हेटमायरने वेस्ट इंडिज संघात पुनरागमन केले आहे, त्याला फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले होते. काईल मेयर्सलाही या संघात स्थान देण्यात आलेले नाही. रोमारियो शेफर्ड, जॉन्सन चार्ल्स आणि शे होप या तुफानी फलंदाजांनाही या संघात स्थान मिळाले आहे. वेस्ट इंडिजनं आतापर्यंत दोनदा टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. वेस्ट इंडिजने 2012 आणि 2016 मध्ये चषक जिंकला.
दोन जूनपासून टी20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिजच्या संघाला ग्रुप क मध्ये ठेवण्यात आला आहे. वेस्ट इंडिजसोबत या ग्रुपमध्ये न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनी आणि युगांडा या संघाचा समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजचा विश्वचषकाचा पहिला सामना दोन जून रोजी पापुआ न्यू गिनी या संघासोबत असेल.
टी20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजचा संघ :
रोवमंन पावेल (कर्णधार), जॉनसन चार्ल्स, रॉस्टन चेज, शिमरोन हेटमेयर, ब्रँडन किंग, शाय होप, निकोलस पूरन, शेरफान रदरफोर्ड, आंद्रे रसेल, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, अलज़ारी जोसेफ (उपकर्णधार), अकील हुसैन, गुडाकेश मोटिए, शमार जोसेफ
Powell (C), Russell, Pooran, Hetmyer, Joseph, Charles, Chase, Holder, Hope, Akeal Hossain, Shamar, King, Motie, Rutherford and Shepherd.