एक्स्प्लोर

IPL 2024: धोनीची जागा कोण घेणार, CSK मध्ये धोनीचा वारसा कोण चालवणार ?

IPL 2024 : अवघ्या आठ दिवसांनंतर आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामात चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे.

IPL 2024 : अवघ्या आठ दिवसांनंतर आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामात चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं पाच वेळा चषकावर नाव कोरले. धोनी म्हटलं की चेन्नई आणि चेन्नई म्हटले की धोनी... हे आयपीएलमधील समीकरण झालेय. धोनीने आय़पीएलमध्ये 250 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 5082 धावा केल्या आहेत, त्यामध्ये 24 अर्धशतकांचा समावेश आहे. 42 वर्षीय धोनी यंदाच्या आयपीएल हंगामानंतर निवृत्ती घेईल, असा अंदाज वर्तवला जातोय. पण धोनीनं निवृत्ती घेतल्यानंतर चेन्नईची धुरा कोण संभाळणार? याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. धोनीसारखा कर्णधार मिळणं कठीण आहे, पण रिप्लेसमेंट तर शोधावीच लागेल. त्यामुळे चेन्नईमध्ये धोनीची जागा कोण घेणार? याची उत्सुकता शिगेला लागली आहे. अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, दीपक चाहर यांच्यासारखी नावे कर्णधारपदासाठी चर्चेत आहेत. 

एमएस धोनीनंतर चेन्नईचा कर्णधार कोण ? सीईओ अन् चेअरमध्ये चर्चा - 

चेन्नई सुपर किंग्स संघाचे सीईओ काशी विश्वनाथन आणि चेअरमन एन श्रीनिवसन यांच्यामध्ये सीएसकेच्या कर्णधारपदावर चर्चा झाली. काशी विश्वनाथन म्हणाले की, "मॅनेजमेंटमध्ये कर्णधारपदावर चर्चा सुरु आहे. सध्या कर्णधार आणि उप कर्णधारपदावर आताच चर्चा नको. याबाबत कोच आणि कर्णधारावर सोडूयात. त्यांनी स्वत: निर्णय घ्यावा आणि आम्हाला सांगावं, त्यानंतर तुमच्यापर्यंत मी ही माहिती पोहचवेल. श्रीनिवासन यांनी मला सांगितलं की, कर्णधार (धोनी) आमि कोच याबाबत निर्णय घेतली. तोपर्यंत आपण शांत राहूयात." काशी विश्वनाथ यांच्या वक्तव्यावरुन असे स्पष्ट होतेय की, चेन्नईचा कर्णधार ठरवण्याचा अधिकार धोनीकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आता धोनी आपला उत्तराधिकारी कधी आणि कुणाला निवडतो, हे पाहावं लागेल. 
 
धोनीच्या चेन्नईनं पाचवेळा चषकावर नाव कोरलं - 
 
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएल 2023 चं विजेतपद पटकावत, पाचव्यांदा अजिंक्यपदाचा मान मिळवला होता. चेन्नईने अंतिम फेरीत हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. चेन्नईच्या रवींद्र जडेजाने  शेवटच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता. चेन्नईनं पहिल्यांदा 2010 मध्ये आयपीएल चषकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर 2011 मध्येही धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं जेतेपद पटकावलं. पण तिसऱ्यांदा चषक उंचावण्यासाठी चेन्नईला सात वर्ष वाट पाहावी लागली.  चेन्नईने 2018 मध्ये तिसऱ्यांदा आयपीएल चषक उंचावला. त्यानंतर 2021 आणि 2023 मध्ये चेन्नईने जेतेपदावर नाव कोरले.  

आयपीएल 2024 च्या पहिल्या टप्प्यातील चेन्नईचं वेळापत्रक - 

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8 वाजता
 
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता
 
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 31 मार्च, वाइजैग, संध्याकाळी 7.30 वाजता
 
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता 

Chennai Super Kings Players: यंदाच्या हंगामासाठी चेन्नईच्या ताफत कोण कोण?
अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी,मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, शार्दूल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, रचिन रविंद्र, अविनाश रॉय 

Chennai Super Kings Players: Ajay Mandal, Ajinkya Rahane, Deepak Chahar, Devon Conway, Maheesh Theekshana, Matheesha Pathirana, Mitchell Santner, Moeen Ali, MS Dhoni, Mukesh Choudhary, Nishant Sindhu, Prashant Solanki, Rajvardhan Hangargekar, Ravindra Jadeja, Ruturaj Gaikwad, Shaik Rasheed, Shivam Dube, Simarjeet Singh, Tushar Deshpande,  Daryl Mitchell,  Sameer Rizvi,  Shardul Thakur,    Mustafizur Rahman,  Rachin Ravindra ,  Avanish Rao Aravelly  

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
Embed widget