Hardik Pandya : IPLच्या सामन्यांना गैरहजर, आता इन्स्टाच्या बायोतून 'पांड्या' उल्लेख हटवला, नताशा-हार्दिकचं बिनसलं?
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्याबाबत Reddit वरील एका पोस्टमुळं तर्क वितर्क सुरु झाले आहेत.
मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) टी-20 संघाचा उपकर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) 2024 हे वर्ष निराशाजनक ठरलं आहे. मुंबईचं नेतृत्त्व करत असलेल्या हार्दिक पांड्याबाबत नव्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चा हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांच्यातील नात्याबाबत चर्चा सुरु आहेत.
हार्दिक पांड्या आण नताशा स्टॅनकोविक हे दोघे 31 मे 2020 रोजी विवाहबद्ध झाले होते. हार्दिक आणि नताशा यांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे. 30 जुलै 2020 रोजी त्याचा जन्म झाला होता. आयपीएलमधील हार्दिक पांड्याच्या निराशाजनक कामगिरीमुळं अपप्रवृत्तीच्या लोकांनी नताशा स्टॅनकोविकला धमक्या दिल्या होत्या. हे सर्व घडत असताना Reddit या प्लॅटफॉर्मवरील पोस्टनंतर वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झालीय.
Reddit वरील एका वापरकर्त्यानं नताशा आणि हार्दिक वेगळे झालेत का याचं उत्तर देताना " ही निव्वळ अफवा आहे, नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या दोघेही इन्स्टाग्रामवर एकमेकांबद्दल काहीच पोस्ट करताना दिसले नाहीत, यापूर्वी नताशाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या नावात नताशा स्टॅनकोविक पांड्या असा उल्लेख होत आत तो नताशा स्टॅनकोविक आहे" असं म्हटलं.
नताशा स्टॅनकोविक आयपीएलपासून दूर
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला प्रेक्षकांच्या शेरेबाजीला सामोरं जावं लागलं. त्यामुळं हार्दिक पांड्याची पत्नी आयपीएलमधील मुंबईच्या सामन्यांना गैरहजर राहिली असावी, असं देखील एका Reddit यूजरनं म्हटलं.
हार्दिक पांड्यासाठी 2024 निराशाजनक
हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्सकडे आला. मुंबईच्या संघात आल्यानंतर हार्दिक पांड्याला टीमचं नेतृत्त्व देण्यात आलं. यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले. हार्दिक पांड्याला वेगवेगळ्या मैदानांवर प्रेक्षकांच्या शेरेबाजीला सामोरं जावं लागलं. मुंबई इंडियन्सचा संघ देखील चांगली कामगिरी करु शकला नाही. मुंबईची टीम आयपीएलच्या गुणतालिकेत दहाव्या स्थानावर राहिली. सावत्र भावाकडून हार्दिक पांड्याची फसवणूक करण्यात आली त्याचं प्रकरण देखील बाहेर आलं.
हार्दिक पांड्याला कमबॅकची संधी
हार्दिक पांड्यासाठी आयपीएल निराशाजनक ठरलं असलं तरी त्याला कमबॅकची संधी आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याला भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी दमदार कामगिरी करुन कमबॅक करु शकतो. हार्दिक पांड्याच्या कामगिरीकडे भारतातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :