IPL 2022: पांड्या बंधू वेगवेगळ्या फ्रेंचायझीसाठी खेळणार; कृणालच्या पत्नीच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टनं आणलं चाहत्यांच्या डोळ्यात पाणी
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) वेगवेगळ्या संघासाठी खेळणार आहेत.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) वेगवेगळ्या संघासाठी खेळणार आहेत. हे दोघेही याआधी मुंबई इंडीयन्सच्या संघासाठी खेळत होते. परंतु, आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये हार्दिकला गुररात टायटन्स तर, कृणाल पांड्याला लखनौ सुपर जॉईंट्स संघानं खरेदी केलंय. यामुळं यंदाच्या हंगामात दोघेही एकमेकांच्याविरोधात खेळणार आहेत. यातच कृणालची पत्नी पंखरी शर्मानं इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केलीय. ही पोस्ट पोहून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलंय.
आयपीएलच्या मागच्या हंगामात हार्दिक आणि कृणाल हे दोघेही एकाच संघासाठी म्हणजेच मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळत होते. परंतु, आयपीएल 2022 मेगा ऑक्शनपूर्वी मुंबईच्या संघानं दोघांना रिलीज केलं. त्यानंतर आयपीएलमधील नवीन फ्रँचायझी गुजरात टायटन्सनं हार्दिक पांड्याला 15 कोटीत खरेदी केलं. तर, लखनौच्या संघानं कृणाल पांड्याला 8.25 कोटीत विकत घेतलंय. यामुळं यंदाच्या हंगामात दोघेही एकमेकांच्याविरोधात खेळणार आहेत.
इन्स्टाग्राम पोस्ट-
यावर कृणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्मानं भावनिक पोस्ट करत म्हणाली की, आयपीएलच्या मागील सहा हंगामात मी तुम्ही दोघांसाठी एकाच स्डेडियमधून चीयर केलंय. परंतु, यावेळी गोष्ट वेगळी आहे. तुम्हा दोघांना ऐकमेकांच्याविरोधात खेळताना पाहून थोड्या वेदना होतील. हार्दिक पांड्या मी तुला दुसऱ्या स्टॅन्डमधून प्रोस्ताहन देत राहिल. आताही आणि नेहमी!
या पोस्टसह कृणालच्या पत्नीनं एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये हार्दिक आणि कृणाल एकत्र खेळताना आणि मजा मस्ती करताना दिसत आहेत. आयपीएलचा पंधरावा हंगाम येत्या 26 मार्चपासून सुरु होणार आहे. तर, आयपीएलच्या चौथ्या सामन्यात 28 मार्च रोजी गुजरात टायटन्स आणि लखनौ आमने- सामने येणार आहेत.
हे देखील वाचा-
- KKR New Jersey: नवा कर्णधार, नवा लूक! कोलकात्याचा संघ आता नव्या जर्सीत उतरणार मैदानात
- Happy Holi 2022: दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं होळी सेलिब्रेशन! एकमेकांवर रंग उधळून खेळाडूंनी लुटला आनंद
- TATA IPL 2022: डेव्हिड वॉर्नरसोबत 'हा' स्फोटक फलंदाज देणार सलामी, येथे पाहा दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA