GT Vs SRH: हार्दिकची पत्नी नताशाचं दमदार सेलिब्रेशन, गुजरातच्या विजयानंतर स्टँडमध्येच लागली नाचायला
GT Vs SRH, IPL 2022: मुंबईच्या वानखेडे मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2022 मधील 40 वा सामना खेळण्यात आला आहे.
GT Vs SRH, IPL 2022: मुंबईच्या वानखेडे मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad) यांच्यात आयपीएल 2022 मधील 40 वा सामना खेळण्यात आला आहे. या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सनं 5 विकेट्सनं विजय मिळवला. दरम्यान, सामना हैदराबादच्या बाजूनं झुकलेला असताना राहुल तेवतिया आणि राशिद खान आक्रमक खेळी करत गुजरातला विजय मिळवून दिला. गुजरातचा विजय पाहून हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्तांकोविक (Natasha Stankovic) स्टँडमध्येच नाचायला लागली. तिच्या दमदार सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालतोय
हैदराबादविरुद्ध सामन्यात अखेरच्या चेंडूवर गुजरातनं विजय मिळवला. दरम्यान, गुजरातला विजयासाठी 24 चेंडूत 56 धावांची गरज होती. त्यावेळी सामना हैदराबादच्या बाजूनं झुकलेला दिसत होता. परंतु, राहुल तेवतिया आणि रशीद खान यांनी 24 चेंडूत 59 धावांची शानदार भागीदारी करत हैदराबादच्या तोंडातून विजयी घास हिसकावून घेतला. गुजरातच्या या रोमहर्षक विजयावर हार्दिक पांड्याची पत्नी नताशानं दमदार सेलिब्रेशन केलं.
व्हिडिओ-
नताशाचा गुजरातला पाठिंबा
गुजरातच्या प्रत्येक सामन्यात नताशा उपस्थित असते. या सामन्यातही ती प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती. ती संपूर्ण वेळ गुजरातच्या खेळाडूंना चिअर करताना दिसली. टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ती अनेकदा दिसली. विशेषत: सामना संपल्यावर गुजरातच्या विजयानंतर नताशानं केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सर्वांना आवडत आहे.
रोमहर्षक सामन्यात गुजरातचा विजय
या सामन्यात हैदराबादच्या संघानं गुजरातसमोर 195 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघानं 16 व्या षटकात 140 धावा करत 5 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या राहुल तेवतिया आणि राशिद खाननं विस्फोटक फलंदाजी करत गुजरातला विजय मिळवून दिला.
हे देखील वाचा-
- IPL 2022: सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा परदेशी खेळाडू कोण? नाव ऐकून बसेल धक्का
- IPL Points Table 2022: हैदराबादला नमवून गुजरात पुन्हा टॉपवर! TOP 4मध्ये हे चार संघ; पर्पल, ऑरेंज कॅप कुणाकडे?
- IPL Points Table 2022: हैदराबादला नमवून गुजरात पुन्हा टॉपवर! TOP 4मध्ये हे चार संघ; पर्पल, ऑरेंज कॅप कुणाकडे?