IPL Points Table 2022: हैदराबादला नमवून गुजरात पुन्हा टॉपवर! TOP 4मध्ये हे चार संघ; पर्पल, ऑरेंज कॅप कुणाकडे?
IPL Points Table 2022 Latest Updates: रात्री झालेल्या रोमांचक सामन्यात सनराइझर्स हैदराबादला नमवत गुजरात टायटंसचा संघ IPL पॉईंट्स टेबलमध्ये नंबर वनवर पोहोचला आहे.
IPL Points Table 2022 Latest Updates : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये काल रात्री झालेल्या रोमांचक सामन्यात विजय मिळवल्यानंतर गुजरातचा संघ पुन्हा पॉईंट्स टेबलमध्ये नंबर वनवर आला आहे. राजस्थान दुसऱ्या स्थानावर गेला असून बाकीच्या संघाच्या क्रमावर काहीही फरक पडलेला नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघानं या आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ एक सामना गमावला आहे. आठपैकी सात सामने जिंकत गुजरातनं 14 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. तर राजस्थानचा संघ आठपैकी सहा सामने जिंकत 12 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
सनराइझर्स हैदराबाद, लखनौ आणि RCB संघाचे प्रत्येकी 10-10 पॉईंटस आहेत. नेट रनरेटच्या आधारे हैदराबाद तिसऱ्या स्थानी तर लखनौ चौथ्या स्थानी आहे. बंगळुरुचा संघ पाचव्या स्थानी आहे. पंजाबचा संघ आठ गुणासह सहाव्या नंबरवर आहे. तर दिल्ली, केकेआर संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. दिल्ली रेन रनरेटच्या आधारे सातव्या तर केकेआर आठव्या स्थानी आहे. चेन्नईचा संघ नवव्या तर मुंबईला अद्याप गुणांचं खातंही उघडता आलेलं नाही.
IPL 2022 पॉइंट्स टेबल:
क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | नेट रन रेट | पॉईंट्स |
1 | GT | 8 | 7 | 1 | 0.371 | 14 |
2 | RR | 8 | 6 | 2 | 0.561 | 12 |
3 | SRH | 8 | 5 | 3 | 0.600 | 10 |
4 | LSG | 8 | 5 | 3 | 0.334 | 10 |
5 | RCB | 9 | 5 | 4 | -0.572 | 10 |
6 | PBKS | 8 | 4 | 4 | -0.419 | 8 |
7 | DC | 7 | 3 | 4 | 0.715 | 6 |
8 | KKR | 8 | 3 | 5 | 0.080 | 6 |
9 | CSK | 8 | 2 | 6 | -0.538 | 4 |
10 | MI | 8 | 0 | 8 | -1.000 | 0 |
चहलकडे पर्पल कॅप
आरसीबीची साथ सोडून राजस्थानमध्ये सामिल झालेल्या युजवेंद्र चहलने यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार करत आहे. त्याने खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये तब्बल 18 गड्यांना माघारी धाडलं आहे. हैदराबादच्या उमरान मलिकनं 15 विकेट्स घेत दुसरं स्थान पटकावलं आहे. तर नटराजननं देखील 15 विकेट्स घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट्स घेतल्यामुळे चहलकडे सध्या पर्पल कॅप देण्यात आली आहे.
बटलरकडे ऑरेंज कॅप
तर सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप ही राजस्थानच्या जोस बटलरकडे कायम आहे. आठ सामन्यात 499 धावा करणाऱ्या बटलरनं या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या नंतर केएल राहुलनं 368 धावा केल्या आहेत. बटलरनं यंदाच्या आयपीएलमध्ये तीन शतकं ठोकली आहेत तर राहुलनं दोन शतकं झळकावलीत.