(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विराटचा रुम पार्टनर, आयपीएलमध्ये बॅन, 4 वर्षानंतर पदार्पण करणारा प्रदीप सांगवान कोण?
GT vs RCB, Pradeep Sangwan : प्रदीप सांगवान याने भेदक मारा करत चार षटकात 19 धावांच्या मोबदल्यात आरसीबीच्या महत्वाच्या दोन खेळाडूंना बाद केले. प्रदीप सांगवान आहे तरी कोण?
GT vs RCB, Pradeep Sangwan : मुंबईमधील ब्रेबॉन स्टेडिअममध्ये गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात यंदाच्या आयपीएलमधील 43 वा सामना सुरु आहे. या सामन्यात गुजरातकडून 31 वर्षीय प्रदीप सांगवान याने पदार्पण केले. गुजरातकडून पदार्पणाच्या सामन्यात प्रदीप सांगवान याने भेदक मारा केला. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेलिसला शून्यावर बाद केले. त्यानंतर विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या प्रदीप सांगवान यालाही तंबूचा रस्ता दाखवला. प्रदीप सांगवान याने चार वर्षानंतर आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. या सामन्यात प्रदीप सांगवान याने भेदक मारा करत चार षटकात 19 धावांच्या मोबदल्यात आरसीबीच्या महत्वाच्या दोन खेळाडूंना बाद केले. भेदक मारा करणारा प्रदीप सांगवान आहे तरी कोण? प्रदीप सांगवान याचे विराट कोहलीसोबतही खास नाते आहे.
कोहलीच्या नेतृत्वात खेळला -
2008 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात प्रदीप सांगवान अंडर 19 टी20 विश्वचषकात खेळला आहे. विश्वचषकात दक्षिण आफ्रिकाविरोधात पाच विकेट घेतल्यामुळे प्रदीप सांगवान चर्चेत आला होता. सांगवानला कॅप्टन्स गोलंदाज म्हणून ओळखले जायचे. प्रदीप सांगवान मोक्याच्या क्षणी विकेट काढत होता.
विराट कोहलीचा रुम पार्टनर -
डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवान आणि विराट कोहलीचं खास नाते आहे. दोघांनी मोठ्या कालावधीसाठी दिल्लीच्या संघासाठी स्थानिक क्रिकेट खेळलेय. या कालावधीत दोघे रुप पार्टनर होते.
दिल्लीच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण -
प्रदीप सांगवान याने 2008 मध्ये दिल्ली डेअरडेविल्स (दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून पदार्पण केले होते. दिल्लीने विराट कोहलीऐवजी प्रदीप सांगवान याला ड्राफ्टमधून घेतले होते. प्रदीपने 2008 मध्ये दिल्लीकडून सात सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्ये 10 आणि 2010 मध्ये प्रदीप सांगवान याने 14 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर दिल्लीने प्रदीप सांगवान याला रिलीज केले होते.
2013 मध्ये बॅन -
2012 मध्ये प्रदीप सांगवान कोलकाता नाइट रायडर्स संघात सामिल झाला होता. प्रदीपने कोलकाताकडून एक सामना खेळला आहे. त्यानंतर डोपिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर बीसीसीआयने प्रदीप सांगवान याच्यावर 15 महिन्याची बंदी घातली होती. 2015-16 मध्ये प्रदीप सांगवान याने रणजी चषकातून पदार्पण केले. या हंगामात प्रदीप सांगवान याने 32 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर 2016 आणि 2017 मध्ये प्रदीप सांगवान आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा भाग होता. दोन वर्षात प्रदीपला फक्त सात सामने खेळायला मिळाले. 2018 मध्ये प्रदीप आरसीबी संघाचा सदस्य होता.
चार वर्षानंतर पुनरागमन -
शनिवारी प्रदीप सांगवान याने चार वर्षानंतर आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. याआधी प्रदीप सांगवान मुंबई इंडियन्सचाही भाग होता. प्रदीप सांगवान याने आयपीएलमधील 40 सामन्यात 37 विकेट घेतल्या आहेत.