(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSK vs MI : आज IPL 2023 मध्ये एल-क्लासिको सामना; चेन्नई विरुद्ध मुंबई जंगी सामना, धोनी आणि रोहित आमने-सामने
CSK vs MI, IPL El Clasico : IPL 2023, CSK vs MI : चेन्नई (CSK) आणि मुंबई (MI) यांच्यातील सामन्याला आयपीएल मधील एल-क्लासिको असंही म्हणतात. हे आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ मानले जातात.
IPL El Clasico CSK vs MI : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये आज डबल हेडर सामने (IPL Double Header) म्हणजे दोन सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएल 2023 मध्ये आजच्या डबल हेडरमधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या दोन चॅम्पियन संघांमध्ये रंगणार आहे. मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएल टी20 स्पर्धेच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ आहेत. त्यामुळेच या दोन संघांतील लढत म्हणजे भारत-पाकिस्तान सामन्यासारखी चुरशीची समजली जाते.
मुंबई आणि चेन्नई आमने सामने
आयपीएल 2023 मध्ये आज धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघ तिसरा सामना तर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघ दुसरा सामना खेळणार आहे. दिल्लीतील घरच्या मैदानावर अरुण जेटली स्डेडिअमवर दुपारी 3.30 वाजता या दोन संघांमधील रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
आज आयपीएल 2023 मध्ये एल-क्लासिको सामना
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) या दोन संघाच्या सामन्याला एल-क्लासिको असं म्हटलं जातं. या दोन संघांच्या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं. दोन्ही संघ सर्वाधिक वेळा आयपीएल चॅम्पियन असून संघांचा चाहतावर्ग देखील फार मोठा आहे.
एल-क्लासिको म्हणजे काय?
एल-क्लासिको (El Clásico) हा स्पॅनिश शब्द असून याचा अर्थ उत्कृष्ट असा आहे. दोन उत्कृष्ट संघांमधील लढत म्हणून दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांतील सामन्याला एल क्लासिको म्हटलं जातं. फुटबॉलमध्ये, बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील सामन्याला एल क्लासिको म्हणतात, कारण दोन्ही संघ लीगमधील सर्वात यशस्वी क्लब आहेत. त्याचप्रमाणे, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्याला एल क्लासिको म्हणतात. कारण, मुंबई इंडियन्स संघ सर्वाधिक 5 वेळा आयपीएल विजेता आहे. तर, चेन्नई संघही 4 वेळा आयपीएल विजेता ठरला आहे.
MI vs CSK, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना 6 मे रोजी चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर रंगणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता खेळवला जाणार असून त्याआधी दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.
Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :