CSK vs DC, IPL 2022: चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार डेव्हॉन कॉनवेचा नवा पराक्रम
CSK vs DC, IPL 2022: चेन्नईच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या संघाची दमछाक झाली. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघानं 91 धावांनी विजय मिळवला.
CSK vs DC, IPL 2022: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) स्टार फलंदाज डेव्हॉन कॉनवेनं (Devon Conway) आयपीएल 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. त्यानं चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना चार पैकी तीन सामन्यात सलग अर्धशतक ठोकलं आहे. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात त्यानं 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमध्ये सलग तीन अर्धशतक करणारा (Third consecutive half century) तिसरा फलंदाज ठरला आहे. चेन्नईसाठी सलग तीन अर्धशतक करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत ऋतुराज गायकवाड पहिला खेळाडू आहे. त्यानंतर फाफ डू प्लेसिसनं आयपीएल 2021 मध्ये हा पराक्रम केला.
कॉनवेने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात डेव्हॉन कॉनवे तिसरे अर्धशतक झळकावले आणि विशेष यादीत सामील झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सर्वोत्कृष्ट सलामीवीरांपैकी एक असलेल्या कॉन्वेने सर्वाधिक चौकार आणि षटकार मारले आहेत. कॉनवेला चेन्नई सुपर किंग्जनं त्याची मूळ किंमत 1 कोटी रुपये देऊन विकत घेतले. या हंगामातील सुरुवातीला पदार्पण सामना खेळल्यानंतर त्याला वगळण्यात आलं होतं.
एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कॉन्वे त्याच्या लग्नासाठी दक्षिण आफ्रिकेत परतला होता. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तो भारतात परतला. त्याला गेल्या रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध साखळी फेरीत खेळण्याची संधी देण्यात आली. या सामन्यात कॉन्वेनं ऋतुराज गायकवाडसह 182 धावांची भागेदारी केली होती. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईच्या संघानं हैदराबादसमोर 203 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हा सामना हैदराबादच्या संघानं 13 धावांनी विजय मिळवला.
मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघानं 91 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं सलामीवीर डेव्हॉन कॉनवेच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्लीसमोर 20 षटकात 209 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 117 धावांवर ऑलआऊट झाला.
हे देखील वाचा-