Points Table 2022 : आरसीबी-सीएसकेच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलची स्थिती काय? ऑरेंज, पर्पल कॅप कुणाकडे?
Points Table 2022 : आयपीएलच्या मैदानात रविवारी दोन सामने पार पडले. पहिल्या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात चेन्नईच्या संघाने दिल्लीवर विजय मिळवला.
Points Table 2022 : आयपीएलच्या मैदानात रविवारी दोन सामने पार पडले. पहिल्या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात चेन्नईच्या संघाने दिल्लीवर विजय मिळवला. आरसीबीचा हा सातवा विजय होता तर चेन्नईचा चौथा विजय होय... दिल्ली आणि हैदराबादचा यंदाच्या हंगामातील सहावा पराभव झाला. आजच्या दोन सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झालाय.
चेन्नईने दिल्लीचा पराभव करत गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीला 91 धावांनी नमवत चेन्नईने नेटरनरेटमध्ये सुधारणा केली आहे. वजा असलेला चेन्नईचा नेटरनरेट आता अधिकमध्ये पोहचला आहे. त्यामुळे चेन्नईच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा आद्याप जिवंत राहिल्या आहेत. चेन्नईने 11 सामन्यात चार विजयासह आठ गुण मिळवले आहेत. चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी इतर संघाच्या विजय आणि पराभवावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्याशिवाय नेटरनरेटही वाढवा लागणार आहे.
आज झालेल्या पहिल्या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा पराभव करत प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलेय. आरसीबीने 12 सामन्यात सात विजय मिळवले आहेत 14 गुणांसह आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. एक विजय मिळवल्यास नेटरनरेटच्या आधारावर आरसीबीचा फैसला होईल.
आज झालेल्या पराभवानंतर हैदराबादचा संघ 10 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे तर दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. दिल्ली, हैदराबाद आणि पंजाब यांचे 10 गुण आहेत. या तिन्ही संघांना प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी पुढील प्रत्येक सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे.
गुणतालिकेत राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघ पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. लखनौने 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. गुजरातच्या संघानेही 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. नेटरनरेटच्या आधारावर लखनौचा संघ अव्वल स्थानावर आहे. राजस्थानचा संघ 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान संघाने 11 सामन्यात सात विजय मिळवले आहेत. सध्या लखनौ, गुजरात, राजस्थान आमि आरसीबी हे चार संघ गुणतालिकेत अव्वल चार क्रमांकावर आहेत. तर मुंबईचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. दिल्ली, हैदराबाद, पंजाब यांच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा आहे. तर कोलकाता आणि चेन्नईलाही संधी आहे, मात्र त्यांना इतर संघाच्या विजय आणि पराभवावर अवलंबून राहावे लागणार आहे.
ऑरेंज कॅप -
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जोस बटलरच्या नावावर आहेत. बटलरने 11 सामन्यात 618 धावा चोपल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राहुलच्या नावावर 451 धावा आहेत. 389 धावांसह फाफ तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. शिखर 381 धावांसह चौथ्या तर 356 धावांसह वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे.
पर्पल कॅप -
ऑरेंज कॅप प्ररमाणेच पर्पल कॅपही राजस्थानच्या खेळाडूकडे आहे. यजुवेंद्र चहलने 11 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर वानंदु हसरंगा 12 सामन्यात 21 विकेट घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे. रबाडा 18, कुलदीप यादव 18 आणि नटराजन 19, अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.